शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘वैभव’च्या धडपडीने ‘ती’ला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 00:17 IST

महाविद्यालयात जाण्यासाठी ८ फेब्रुवारीला बसमधून प्रवास करताना ‘त्याने’ अपघात पाहिला. दोन चारचाकी वाहनांच्या अपघातात. जखमी झालेली तरूणी त्याला दिसली.

पोलीस मित्राची कर्तव्यतत्परता : गृहराज्यमंत्र्यांनी केला गौरव अमरावती : महाविद्यालयात जाण्यासाठी ८ फेब्रुवारीला बसमधून प्रवास करताना ‘त्याने’ अपघात पाहिला. दोन चारचाकी वाहनांच्या अपघातात. जखमी झालेली तरूणी त्याला दिसली. गंभीर जखमी अवस्थेत. भोवती बघ्यांची गर्दी. पण, मदतीसाठी कुणीच नाही. ती बेशुध्द होती. भळाभळा रक्त वाहत होते. कुणी चर्चा करीत होते. अपघात कसा झाला यावर कुणी मत व्यक्त करीत होते तर कुणी चक्क मोबाईलमध्ये फोटोसेशन करीत होते. पण, ‘तो’ बसमधून खाली उतरला. त्याने तरूणीला पाणी पाजले. पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. आज ती जिवंत आहे. या धाडसी आणि कर्तव्यतत्पर पोलीस मित्राच्या कर्तृत्वाचा गृहराज्यमंत्र्यांनी नुकताच गौरव केलाय. त्याचे वय अवघे अठरा वर्षे. विदर्भ महाविद्यालयात कंप्युटर सायन्सचा विद्यार्थी. सायन्सचा विद्यार्थी म्हटला की अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या मुलाची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पण, तो पुस्तकी कीडा नाही. आसपास घडणाऱ्या घटनांचे सामाजिक भान त्याला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीवही त्याला आहे. त्याचे नाव वैभव नंदकिशोर निमकर. तो मूळ भातकुली येथील रहिवासी. शहरातील विमवी तो कंप्युटर सायन्सला शिकतोय. समाजसेवेच्या या आवडीमुळेच तो ‘पोलीस मित्र’ बनलाय. तो म्हणतो, ‘त्या अपघातग्रस्त तरूणीमध्ये मला माझी बहिण दिसली. मी लगेच डीसीपी सोमनाथ घार्गेंना दूरध्वनी केला. ते घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस ताफ्याने तरूणीला इर्विनमध्ये नेले. आज ती जिवंत आहे. माझ्यामुळे एका तरूणीचे प्राण वाचले, यातच सगळे आले.’ (प्रतिनिधी)सैन्यात अधिकारी व्हायचंयशिक्षणात हुशार असलेल्या वैभवला सैन्यात जाऊन अधिकारीपद भूषविण्याची इच्छा आहे. देशप्रेमाच्या वेडाने झपाटलेल्या वैभवला समाजातील दुर्बल घटकांना मदत करायचीय. त्यांना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे आहेत. नागरिकांनी कर्तव्य बजावावे'लोकमत'शी बोलताना वैभव म्हणाला, एखादा अपघात घडल्यास नागरिक बघ्याची भूमिका घेतात. जखमीला रूग्णालयात पोहोचविण्याचे सौजन्यदेखील कुणी दाखवीत नाही. पण, नागरिकांनी त्यांचे कर्तव्य बजावल्यास अनेक अपघातग्रस्तांना जीवदान मिळू शकतात.