शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पशुपक्ष्यांवर होतोय विषाक्त धान्याचा वापर

By admin | Updated: June 21, 2014 23:46 IST

जंगलानजीक असलेल्या शेतांमध्ये वन्यप्राणी व पशुपक्ष्यांचा हैदोेस वाढला आहे. तो थांबविण्यासाठी शेतात विषाक्त धान्य पसरविण्याचा फंडा अमरावती शहराजवळील इंदला जंगलाशेजारचे शेतकरी व शिकारी वापरत

वैभव बाबरेकर - अमरावतीजंगलानजीक असलेल्या शेतांमध्ये वन्यप्राणी व पशुपक्ष्यांचा हैदोेस वाढला आहे. तो थांबविण्यासाठी शेतात विषाक्त धान्य पसरविण्याचा फंडा अमरावती शहराजवळील इंदला जंगलाशेजारचे शेतकरी व शिकारी वापरत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे. इंदला जंगलानजीक अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. शेतात डौलात असलेल्या पिकांची वन्यपशू व पक्षी नासाडी करीत असल्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शेतांमध्ये चक्क विषाक्त धान्य पसरवून अनेक पक्ष्यांना यमसदनी पोहोचवीत असल्याची माहिती आहे. हा प्रकार वेळीच थांबावा यासाठी वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत जंगलातील वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे, फासे व विषाक्त पाण्याचा वापर केला जात असे. मात्र, आता या पद्धतीत बदल झाल्याचे दिसते. विषाक्त पाण्यात कडधान्ये भिजवून पक्ष्यांसमोर पसरविले जाते. असे दान्य खाण्यात आल्याने कित्येक पक्ष्यांचा बळी गेला आहे. पशूदेखील मृत्युमुखी पडले आहेत. शेतकरी स्वत:च्या शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी हा फंडा वापरतात. तर शिकाऱ्यांनी पशु-पक्ष्यांच्या शिकारीसाठी या नवा मार्गाचा अवलंब केला आहे. वडाळी वनपरिक्षेत्रातील इंदला गावाजवळ अनेक शेतशिवार आहेत. विषाक्त कडधान्य पसरवून पशू-पक्ष्यांची शिकार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे व त्यांच्या चमूने फ्रेजरपुरा पोलिसांसह इंदला भागातील संशयास्पद शेतशिवारांची पाहणी केली. यावेळी धक्कादायक परिस्थिती वन विभागाच्या निदर्शनास आली. एका शेतशिवारातील कुटाराजवळ पसरलेले कडधान्य विषाक्त असल्याचे आढळून आले. मात्र, हे धान्य कोणी टाकले याबाबत शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.