शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

उर्ध्व वर्धात गतवर्षीपेक्षा अडीच मीटरने साठा कमी

By admin | Updated: July 7, 2016 00:05 IST

चार दिवसांपासून मोर्शी तालुक्यात सातत्याने पाऊस पडत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात २५४.८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सध्या ३३६ मीटर साठा : पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा
मोर्शी : चार दिवसांपासून मोर्शी तालुक्यात सातत्याने पाऊस पडत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात २५४.८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा आजच्या तारखेस हा पाउस अधिक बरसला असला तरी अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर मागील वर्षापेक्षा सध्या २.३९ मिटर ने कमी आहे.
यावर्षी ५ जुलैपर्यंत तालुक्यात २५४.८४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच तारखेपर्यंत २१४.८७ मिमी पाउस बरसला होता. एकूणच आजच्या स्थितीत ३९.९७ मिमी पाऊस जास्त बरसला असला तरी अप्पर वर्धा धरणातील जलस्तराची स्थिती मागील वर्षापेक्षा कमी आहे.
मागील वर्षी अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर ३३८.९९ मीटर होता. यावर्षी मात्र जलस्तर ३३६.६० मीटर म्हणजेच मागील वर्षापेक्षा २.३० मीटरने कमी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसल्यास जलस्तर वाढीस मदत होईल.
अप्पर वर्धा धरणातील सध्या एकूण जलसाठा २७३.२६ दशलक्ष घनमिटर एवढा असून उपयुक्त जलसाठा १५९.०४ दशलक्ष घनमिटर आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी २८.२० एवढी आहे. दरवर्षी पावसाळ्यात धरणातील जलसंग्रहणाचे नियोजन करण्यात येते. यावर्षी जुलै महिन्यात ३४१.२० मीटर एवढा महत्तम जलसाठा ठेवण्यात येणार आहे. सध्या धरणातील जल पातळी ३३६.६० मीटर असून नियोजित पातळी गाठण्याकरिता अजूनही ४.६० मीटर जलस्तर वाढणे आवश्यक आहे. जुलै संपण्याकरीता अजून तीन आठवड्यांचा अवधी आहे. या कालावधीत पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसल्यास नियोजित जलस्तर गाठणे अशक्य नसल्याचे अभियंता सहायक साने यांनी 'लोकमत'ला सांगितले.(तालुका प्रतिनिधी)