शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाची हिवाळी २०२० परीक्षा होणार ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST

अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसंबंधी प्रतिबंध ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती ...

अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसंबंधी प्रतिबंध ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२० परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत नियोजन चालविले आहे. विविध प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर १५ फेब्रुवारी २०२१ पासून हिवाळी परीक्षा सुरू होतील, अशी माहिती आहे.

विद्यापीठाने नवीन शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार १५ फेब्रवारी ते २० मार्च २०२० या दरम्यान हिवाळी परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षा विभागाने हिवाळी परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याची तयारी आहे. मात्र, कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने शासन गाईड लाईननुसार नियमात कठोरपणा आणून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती आहे. हिवाळी २०२० ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्धारे घेण्यात येणार आहे. परीक्षा, निकाल, मूल्यांकनाचे स्वरूप, ऑनलाईन परीक्षा फाॅर्म आदी बाबी निश्चित करण्यासाठी परीक्षा मंडळ, विद्वत्‌ परिषद, व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेऊनच केली जाणार आहे. ही परीक्षा प्रथम वर्ष वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांची घेण्यात येणार आहे.

-----------------------

महाविद्यालयस्तरावरच होईल परीक्षा

हिवाळी २०२० परीक्षा ही महाविद्यालयस्तरावरच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. बहुुपर्यायी प्रश्नावलीच्या आधारे होणाऱ्या परीक्षेची नियमावली कठोर करण्यात येणार आहे. पावणेचार लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील. विद्यार्थ्यांना परीक्षा फाॅर्म गुगलवर ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षा होताच ३० दिवसात निकाल जाहीर होतील, अशी तयारी प्रशासनाने चालविली आहे.

---------------------

प्रचलित पद्धतीने हिवाळी परीक्षांच्या नियोजनाची तयारी आहे. मात्र, कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ येणार असल्याने परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी, विविध प्राधिकरणात चर्चा करूनच त्यांच्या मान्यतेनुसार बहुपर्यायी प्रश्नावलीद्धारे ऑनलाईन परीक्षा होतील.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.