शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातर्फे मतदार जागृतीसाठी रथयात्रेचा शुभारंभ

By admin | Updated: January 11, 2017 00:17 IST

सदृढ लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार जास्तीत-जास्त नागरिकांनी वापरावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी,

प्रचार-प्रसार : राज्य निवडणूक आयुक्तांनी दाखविली हिरवी झेंडीअमरावती : सदृढ लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार जास्तीत-जास्त नागरिकांनी वापरावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासनातर्फे राबविल्या जात असलेले मतदार जागृती अभियान, कॅशलेस सोसायटी निर्माणासाठी वित्तीय साक्षरता अभियान, स्वच्छ भारत अभियानाचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. त्यासाठी रथयात्रा काढून गावो-गावी प्रसार व प्रचार केला जाणार आहे. रथ यात्रेच्या रॅलीला शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून नुकतेच राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात करण्यात आला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गाडगेबाबांच्या घोषणेसह रा.से.यो. स्वयंसेवकांनी मतदार जनजागृतीचे नारे दिले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गीते, कुलसचिव अजय देशमुख, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, रा.से.यो. समन्वयक गणेश मालटे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चवरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मतदार जनजागृती अभियानांतर्गत जागरूक मतदार सशक्त लोकशाही, युवा मतदार लोकशाहीचा आधार, मतदान करू देश घडवू, मतदानाद्वारे कर्तव्य, मतदार राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो, लोकशाहीचा राजा मी वाढवीण देशाचा मान, मी या स्लोगनद्वारे मतदार जागृती तसेच कॅशलेस व्यवहारासाठी वित्तीय साक्षरता अभियान व आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व विशद करणारे स्वच्छ भारत अभियान आदी स्लोगनद्वारे माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. दारापूर येथील डॉ.कमलताई इन्स्टिटज्ूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने रथाचे प्रायोजक्तत्व स्वीकारले असून संचालक विद्यार्थी कल्याण गणेश मालटे यांच्यासह रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व क्षेत्रीय समन्वयक संतोष यावले व रा.से.यो. विद्यार्थी जनजागृती कार्यात प्रयत्नशील आहेत.