दोन हजारांची लाच घेताना महावितरणचे दोन कर्मचारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST2021-02-06T04:21:29+5:302021-02-06T04:21:29+5:30

तिवसा : हॉटेलमधील मीटरचे बिल लावले तेव्हापासून न घेता ते सुरू झाल्यापासून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तिवसा येथील ...

Two MSEDCL employees caught taking bribe of Rs 2,000 | दोन हजारांची लाच घेताना महावितरणचे दोन कर्मचारी जाळ्यात

दोन हजारांची लाच घेताना महावितरणचे दोन कर्मचारी जाळ्यात

तिवसा : हॉटेलमधील मीटरचे बिल लावले तेव्हापासून न घेता ते सुरू झाल्यापासून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तिवसा येथील महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक. वरिष्ट तंत्रज्ञ नंदू मानकर व कंत्राटी कामगार वैभव चिंचखेडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. नंदू मानकर व वैभव चिंचखेडे यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंति दोन हजार रुपये स्वीकारण्याचे या आरोपींनी मान्य केले. दरम्यान हॉटेल व्यावसायिकाने आधीच या दोघांची तक्रार केल्याने मंगळवारी दोन्ही आरोपींना महावितरणच्या स्थानिक कार्यालयातच दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना तिवसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे, प्रमोद धानोरकर, पंकज बोरसे, राजेश कोचे, शैलेश कडू, सुनील जायभाये, सतीश किटुकले यांनी केली.

Web Title: Two MSEDCL employees caught taking bribe of Rs 2,000