अवैध वाळू तस्करी करणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:15+5:302021-02-05T05:32:15+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चांदूर बाजार : स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात ...

Two arrested for illegal sand smuggling | अवैध वाळू तस्करी करणारे दोघे ताब्यात

अवैध वाळू तस्करी करणारे दोघे ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदूर बाजार : स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी चेतन ऊर्फ गोलू तळकित (२७, रा. कोतगावंडी), दिनेश खटे (२४, रा. तुळजापूर गढी) हे आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत दहीगाव ते लसनापूर मार्गाने वाळू तस्करी करीत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाखांचा ट्रॅक्टर, पाच हजारांची एक ब्रास काळी रेती, १० हजारांचे मोबाईल, ४० हजारांची दुचाकी असा एकूण ५ लाख ५० हजार रुपरायचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, हेडकॉन्स्टेबल त्र्यंबक मनोहर, नायक पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद खर्चे व नीलेश डांगोरे, कॉन्स्टेबल प्रवीण अंबाडकर व अमोल केंद्रे यांनी केली.

Web Title: Two arrested for illegal sand smuggling