शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना सौजन्याची वागणूक द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:24 IST

सर्वांना आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता येतात. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असतात; परंतु त्यांची हेळसांळ केल्या जाते.

ठळक मुद्देपंकज भोयर यांचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वांना आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता येतात. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असतात; परंतु त्यांची हेळसांळ केल्या जाते. त्यांना योग्य वागणुकही दिल्या जात नाही. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापुढे रुग्ण व नातेवाईकांना सौजन्याची वागणूक देऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करावे असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांना दिले.आ. डॉ. पंकज भोयर यांच्या जनसंपर्क कार्यालयात या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत आॅटो चालकांनी आ. भोयर यांची भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत केले होते. तथापि आमदारांनी या बाबींची दखल घेवून शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले. बैठकीत आॅटो चालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी आॅटो चालकांनी सांगितले की, आम्ही दररोज शहर व ग्रामीण भागातून येणाºया रुग्णाना जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचवितो. अनेकदा अत्यवस्थ स्थितीतही रुग्णांना दवाखान्यात आणले जाते; परंतु रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार न करता उर्मटपणाची वागणूक दिल्या जाते. अनेकदा रुग्ण गंभीर असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे ही बा त्या रुग्णाच्या जीवावरही बेतते. परिवारातील सदस्यांना कधी रुग्णालयात नेले तर या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे आॅटो चालकांनी बैठकीत सांगितले. विविध समस्यांचा पाढा वाचला.आॅटोचालकांनी वाचला असुविधांचा पाढारुग्णालयात स्वच्छतेचा अभाव असून अनेक ठिकाणी अस्वच्छता असते. अनेकदा डॉक्टर रुग्णालयात आपल्या ठराविक वेळेत न येणे, रुग्णावर थातुरमातूर उपचार आदि बाबी सांगितल्या. आॅटो चालकांनी रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन, इसीजी साठी नियुक्त असलेल्या एकच तंत्रज्ञ, रक्तदाब मोजतांना होणारी टोलवाटोलव व अन्य असुविधांबाबत बैठकीत माहिती दिली. यावर आ. डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मडावी यांना विचारणा केली. तसेच रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवाव्या असे निर्देश देत इसीजी विभागासाठी आणखी एका महिला तंत्रज्ञानाची नियुक्ती करावी असे निर्देश दिले. शासन स्तरावर काही प्रश्न असल्यास ते कळवावे असेही डॉ. मडावी यांना सांगितले.