शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांपासून ‘ट्रामा केअर’ अडगळीत

By admin | Updated: October 3, 2015 00:11 IST

बडनेऱ्यातील ट्रामा केअर हॉस्पिटल तब्बल अडीच वर्षांपासून इमारतीसह सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असताना देखील...

शासन-प्रशासन उदासीन : पालकमंत्री घेणार का दखल? लोकमत विशेषश्यामकांत सहस्त्रभोजने  बडनेराबडनेऱ्यातील ट्रामा केअर हॉस्पिटल तब्बल अडीच वर्षांपासून इमारतीसह सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असताना देखील शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणापायी सुरु होऊ शकलेले नाही. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी खुद्द या अत्यावश्यक सेवेला रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेऊन सुरू करावे, असे बोलल्या जात आहे. २०११ सालात ट्रामा केअर हॉस्पिटलच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. अवघ्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत उभी करुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत ट्रामा केअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत सुरू करण्यासाठी बडनेरा शहरवासीय तसेच परिसरवासीयांना आश्वासनाची खैरात वाटण्यात आली. त्यात याचा समावेश होता. इमारत उभी होऊन तब्बल अडिच वर्षाचा तर विधानसभा निवडणुकांना एक वर्षाचा कालावधी लोटूनदेखील बडनेऱ्याचे ट्रामा केअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत रुजू झालेले नाही. लाखो रुपये शासनाने या ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी खर्च केले आहे. सध्या दोन डॉक्टर देखील या ठिकाणी देण्यात आले आहे. ते मोदी दवाखान्याचे रुग्ण तपासीत आहे. तीन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहे. विद्युत पुरवठा तसेच इतर देखभालीवर शासनाचे लाखों रुपये वायफळ खर्च होत आहे. ट्राम केअर हॉस्पिटलमध्ये सर्वसोयीसुविधा उपलब्ध आहे. केवळ कर्मचाऱ्यांची कमी असल्याचा कांगावा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील संबंधित अधिकारी करीत आहे. ट्रामा केअर हॉस्पीटलचा मुद्दा अडगळीत का पडला आहे हा प्रश्न बडनेरा शहरासह परिसरवासीयांमध्ये आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी याकडे लक्ष पुरवावे व ट्रामा केअर हॉस्पिटलला रुग्णांच्या सेवेत सुरू करावे, असे बडनेरावासीयांमध्ये बोलल्या जात आहे. वर्षभरात अपघाताचे हजारो रुग्णयवतमाळ व अकोला महामार्गावर अपघातांचे मोठे प्रमाण आहे. अमरावतीत ५० किलोमीटर लांब अंतरावरील अपघातांचे रुग्ण उपचारासाठी रुग्णवाहिकेने येत असतात. दरम्यान अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे दगावत असल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहे. बडनेऱ्यातील ट्रामा केअर हॉस्पिटल सुरू झाल्यास वेळेत उपचर मिळून अनेकांचे जीव वाचतील, असे कळकळीने परिसरवासीय बोलीत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून पालकमंत्र्यांनीच याची दखल घ्यावी, असेही बोलल्या जात आहे.