शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

अश्री कॉलनीत टॉवर उभारणीला ब्रेक; घरमालकांना नोटीस

By admin | Updated: May 26, 2015 00:10 IST

बेनोडा परिसरातील श्री कॉलनीत नियमबाह्य पद्धतीने उभारले जात असलेल्या मोबाईल टॉवरचे बांधकाम थांबविले

महापौरांच्या कक्षात बैठक : अविनाश मार्डीकर, ममता आवारे यांचा पुढाकारअमरावती : बेनोडा परिसरातील श्री कॉलनीत नियमबाह्य पद्धतीने उभारले जात असलेल्या मोबाईल टॉवरचे बांधकाम थांबविले आहे. एवढेच नव्हे तर घरमालकाने बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात सोमवारी महापौर चरणजितकौर नंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.श्री कॉलनीत नियमबाह्यरीत्या पोलीस बंदोबस्तात उभारले जाणारे हे मोबाईल टॉवरचे बांधकाम या भागाचे नगरसेवक अविनाश मार्डीकर, ममता आवारे यांनी नागरिकांच्या सहकार्याने रविवारी बंद पाडले. मात्र, महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सोमवारी चर्चा करण्यात आली. मोबाईल टॉवर उभारणीसाठी केवळ अर्ज देऊन कालावधी पूर्ण करुन परवानगी न घेता हे टॉवर उभारले जात असल्याची बाब स्पष्ट झाली. यावेळी उपायुक्त विनायक औगड यांनी देखील वस्तुस्थिती जाणून घेताना एडीटीपी विभागाच्या अभियंत्यांना फटकारले. दरम्यान टॉवर उभारणी करणाऱ्या कंपनीचे राठोड यांना बोलावण्यात आले. कागदपत्रे तपासली तेव्हा केवळ टॉवर उभारणीचा अर्ज सादर करुन न्यायालयाच्या निर्देशानुसार मंजुरीची ही बाब पुढे करण्याचा रुबाब हा अधिकारी दाखवीत होता. टॉवरचे बांधकाम बंद पाडले तर न्यायालयाचा अवमान होईल, अशी धमकी देत असताना राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेते अविनाश मार्डीकर हे टॉवर उभारणी करणाऱ्या राठोड नामक अधिकाऱ्यांवर जाम उखडले. महापालिका प्रशासनाने परवानगी दिली काय? हे उत्तर द्या, त्यानंतर कोर्टाची भाषा करा असे सुनावत त्यांना चूप केले. यावेळी नागरिकही संतापले. काहीही झाले तर हे टॉवर उभारले जाऊ देणार नाही. नगरसेविका ममता आवारे यांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला. श्री कॉलनीत दादाराव रुमाले यांच्या घरावर हे टॉवर उभारले जात असताना या घराचे बांधकाम नियमबाह्य असल्याची बाब एडीटीपी विभागाच्या निदर्शनास आली. त्यामुळे एडीटीपी विभागाने दादाराव रुमाले यांना मंजुरीप्रमाणे बांधकाम करण्यात आले नसल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावली आहे. अतिशय आक्रमकपणे नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारणीला विरोध दर्शविला. बैठकीनंतर महापौर चरणजितकौर नंदा यांनी टॉवर उभारणी करणारी कंपनी आणि घर मालकाला नोटीस बजावून कायदेशीर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिलेत. यावेळी मिलींद बांबल, संदीप आवारे, लकी नंदा, हरजितसिंग बग्गा, प्रब्जोतसिंग बग्गा, उषाताई अजमिरे, श्रीराम अजमिरे, श्रीकांत पाचघरे, नितीन देशमुख, प्रतीभा अंधारे, पां.बा. अंधारे, पुरुषोत्तम धानखडे, मंगेश येवतीकर, दिली काळे, अतुल गिते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अभियंत्यांनी काही क्षणात बजावली नोटीसश्री कॉलनीत नियमबाह्य पद्धतीने मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपनीला तसेच घरमालकांना काही क्षणात नोटीस बजावून कार्यतत्परता दाखविली. परवानगी न घेता प्रशासनाला दोषी ठरविणाऱ्या राठोड नामक टॉवर उभारणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस बजावून चूप केले. हेमंत महाजन, घनश्याम वाघाडे, विंचूरकर या अभियंत्यांनी नियमानुसार पुढील कारवाई केली.