शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कुष्ठरोगमुक्तीसाठी 'स्पर्श' जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 15:23 IST

२६ जानेवारीला प्रतिज्ञा वाचन; शाळा-महाविद्यालये, शासकीय-खासगी संस्थांचा समावेश

अमरावती : ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध' या घोषवाक्याच्या साह्याने आरोग्य विभागातर्फे 'स्पर्श' जनजागृती अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृतीसाठी २६ जानेवारी रोजी एकाच वेळी ग्रामसभा, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रतिज्ञा वाचन होणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृतीकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्याचे वाटप स्पर्श जनजागृती अभियानाचे पर्यवेक्षण करण्याच्या सूचना दिल्या जातील. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाचे वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचांमार्फत वाचन होईल.

कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलनाबाबत प्रतिज्ञा, विद्यार्थ्यांसह गावातील प्रौढ व्यक्तींमार्फत अ‍ॅक्टिव्हिटीद्वारे जनजागृती, उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्याचे सहायक संचालक, जिल्हा क्षयरोग अधिकारी व शहर क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनात अशासकीय समाजसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय समाजसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब आदी संस्था कुष्ठरोग निवारण दिनी या आजाराविषयी उपचार व निदानाबाबत शास्त्रीय माहिती देणार आहे.यांचा राहणार सहभाग

सदर उपक्रम पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामविकास, नागरी विकास, माता व बाल संगोपन केंद्र, सामाजिक न्याय विभाग आदी विभागांच्या सहकार्याने व वैद्यकीय अधिकाºयांच्या मार्गदर्शनात राबविला जाणार आहे. यासाठी समितीदेखील गठित झाली आहे. जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष, सहायक संचालक सदस्य सचिव, तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा आशा समन्वयक व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी राहतील. तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी राहतील.कुष्ठरोगाचे समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात 'स्पर्श' जनजागृती अभियानांतर्गत २६ जानेवारी रोजी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये प्रतिज्ञा वाचन होईल. या उपक्रमात नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.- डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन अधिकारी

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र