शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची सर्वपक्षीय संघर्षयात्रा आज जिल्ह्यात

By admin | Updated: March 30, 2017 00:09 IST

कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव व राज्यातील ढासळलेली कायदा, सुव्यवस्था आणि कर्जमाफीसाठी सभागृहात आवाज उठविणाऱ्या आमदारांवर झालेली निलंबन कारवाई .....

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी : तिवसा येथे जाहीर सभा अमरावती : कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव व राज्यातील ढासळलेली कायदा, सुव्यवस्था आणि कर्जमाफीसाठी सभागृहात आवाज उठविणाऱ्या आमदारांवर झालेली निलंबन कारवाई याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष व एमआयएमच्यावतीने२९ मार्चपासून सुरू केलेली चांदा ते बांदा ही संघर्षयात्रा जिल्ह्यात गुरूवार ३० मार्च रोजी दाखल होणार असून, तिवसा येथे सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा होणार आहे. राज्यातील शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करीत असताना सरकार मात्र या बाबत गंभीर नाही. तसेच शेतात राबून पिकविलेल्या मालाला हमीभाव नसल्यामुळे हा माल व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात विकावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर व्यापारी मात्र मालामाल असल्याचा आरोपही संघर्ष यात्रेत उपस्थित करण्यात येणार आहे. अच्छे दिन आल्याचा कांगावा सरकारकडून करण्यात येत असला तरी नेमके इच्छे दिन आले कुणाचे असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना कर्जमाफीसाठी मंत्रालयात न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण झाली, राज्यातील कायदा व सुव्यवस्थासुद्धा बेलगाम झाली. याच पृष्ठभूमिवर सभागृहात आवाज उठविणाऱ्या आमदारांना निलंबित करण्यात आले. सरकारच्या यासुलतानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी २९ मार्चपासून ही संघर्षयात्रा सुरू झाली आहे. यायात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. तिवसा येथे जाहिर सभेनंतर ही संघर्ष यात्रा चांदूररेल्वेला प्रयाण करणार असून रात्री ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. संघर्षयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. या संघर्षयात्रेतून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.