शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून आरटीओचे आॅनलाईन कामकाज

By admin | Updated: March 1, 2017 00:12 IST

प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतलेले ४.० सारथी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सुविधा : ४.० सारथी आॅनलाईन सेवा अद्ययावतअमरावती : प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतलेले ४.० सारथी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा स्पीड वाढवण्यात येत आहे. बुधवार १ मार्चपासून नागरिकांना घरबसल्या अर्ज भरणे, अपॉइंटमेंट घेणे आदी कामे सारथीच्या माध्यमातून केले जाणार आहे.परवान्यासाठी अर्ज, वाहन नोंदणी, परवान्याची कागदपत्रे आॅनलाईन सादर करणे, वाहन चाचणी, अपॉर्इंटमेंट घेता यावी, सर्व शुल्क भरणे यासह विविध सेवा सुविधा घरबसल्या करुन देण्यासाठी जुन्या सारथी ऐवजी ४.० सारथी सेवा अपडेट करण्याचे काम सद्या प्रादेशिक परिवहन विभागात सुरू आहे. वाहन सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित केली आहे. परीक्षेसाठी अर्ज करून तारीख घेणे, पक्का परवाना, नुतनीकरण, दुय्यम परवाना, परवान्यासंदर्भातील इतर माहिती आॅनलाईन करण्यात आली आहे. यापूर्वीच्या स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर जावे आॅनलाईन सर्व्हीस+सारथी सर्व्हीसवर जावे त्यानंतर आॅनलाईन अपॉइंटमेंट, अपलोड डाक्युेंट अपॉइंटमेंट, फ्री पेमेंट असे आपल्याला हवे तसे आॅप्शन निवडता येतील. आॅनलाईन अपॉर्इंटमेंट शिकाऊ व पक्क्या परवान्यासाठी अर्ज करता येईल. अशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा घरबसल्या मिळणार आहे. यात काही अडचणी आल्यास प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर व एआरटीओ विजय काठोळे यांनी केले आहे.काय होणार फायदा?आरटीओतील गर्दी कमी होणार आहे. दलालांना चाप बसेल नागरिकांची लूट थांबण्यास मदत होईल, कामकाजात पारदर्शकता येईल, भ्रष्टाचारालाही आळा बसेल, डेडलाईनप्रमाणे कामे होतील.