शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून गणेश विसर्जनाची लगबग

By admin | Updated: September 27, 2015 00:13 IST

जिल्ह्यात यंदा १ हजार ६६५ गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. रविवारपासून गणेश विसर्जनाची लगबग सुरू होणार आहे.

पोलिसांचा बंदोबस्त : वडाळी, छत्री, प्रथमेश तलावात विसर्जनाची सुविधाअमरावती : जिल्ह्यात यंदा १ हजार ६६५ गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. रविवारपासून गणेश विसर्जनाची लगबग सुरू होणार आहे. गणेश विसर्जनादरम्यान मिरवणुकीसाठी जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्यात १८ सप्टेंबर रोजी गणेश मंडळांनी गणपती स्थापना केली असून गणेश विसर्जनाच्या तयारीला आता वेग येणार आहे. रविवारी गणपती स्थापनेला १० दिवस पूर्ण होणार असून जिल्ह्याभरात गणेश विसर्जनाची धूम राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ हजार १५१ तर शहरात ५१४ गणेश मंडळांनी अधिकृत नोंदणी करून गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश विसर्जनावेळी काही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त लावला आहे. त्यातच गुन्हेगारी प्रवृतीच्या नागरिकांनाही नोटीस बजावून काही गुन्हेगारांना ताब्यातसुध्दा घेतले आहे. एसआरपीएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, पोलीस अधिकारी, होमगार्ड, सीआयडी, आरपीटीएस यांचा जिल्ह्यात बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांनाही बंदोबस्तादरम्यान उपस्थित राहण्याची विनंती पोलीस विभागाने केली आहे. त्यातच सिव्हील ड्रेसमध्येही पोलीस उपस्थित राहणार आहेत. गणेश विसर्जनासाठी वडाळी, छत्री व प्रथमेथ तलाव सज्ज करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सीसीटीव्हीची करडी नजरगणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. शहरातील मुख्य मार्ग व विसर्जन स्थळावर नजर आहे. संवेदनशील ठिकाणी १५ ते १६ सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. नागरिकांनी उत्सव हा उत्सवाप्रमाणेच साजरा केला पाहिजे. उत्साहाच्या भरात दुसऱ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी भक्तांनी घेतली पाहिजे, असे आवाहन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे. विसर्जनस्थळी सुविधा, सुरक्षाछत्री , प्रथमेश व वडाळी तलावजवळील सुविधा व सुरक्षेची शुक्रवारी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार व आ. रवी राणा यांनी पाहणी केली. यावेळी जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, किशोर पिवाल उपस्थित होते.