शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१,२६८ कोटींचे कर्ज थकीत

By admin | Updated: April 9, 2017 00:02 IST

सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

कर्जमाफी केव्हा ? : दोन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा अमरावती : सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी विरोधी पक्षांनी रान उठविले. सातबारा कोरा होणार, या प्रतीक्षेत जिल्ह्यात ३१ मार्चअखेर दोन लाख तीन हजार शेतकऱ्यांकडे १२६७ कोटी रूपयांचे पीककर्ज थकीत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी कर्ज उपलब्ध होण्यास शेतकऱ्यांना अडसर निर्माण होणार आहे. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफीनंतर राज्यातदेखील याच निर्णयाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. मागील तीन वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले व नव्याने कर्ज देण्यात आले.मागील खरीप हंगामात सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन झाले. मात्र हमीपेक्षा कित्येक पट कमी अशा दोन हजार रूपये क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. रबीमध्ये तुरीचीदेखील हीच अवस्था आहे. उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. अधिक झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाला धारेवर धरले आहे. सभागृहात व सभागृहाबाहेर तसेच गावागावांत आता कर्जमुक्तीसाठी संघर्ष इरेला पेटला असल्याने शेतकऱ्यांनीदेखील कर्ज माफ होईल, या आशेने कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात थकीत झाले आहे. कर्जमाफी न झाल्यास किंवा यावर शासनाने तोडगा न काढल्यास येत्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी उत्पन्न होणार आहे. (प्रतिनिधी)रबीत कर्जवाटपच नाहीरबी हंगामासाठी जिल्ह्यास ३८६ कोटी २२ लाख रूपयांचे लक्ष्यांक आहे. यामध्ये शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेस १२५ कोटी ४२ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटपाचा टक्का निरंक आहे. तसेच ग्रामीण बँकांना २ कोटी १६ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटप शून्य टक्के आहे. केवळ राष्ट्रीयीकृत बँकांनी २६० कोटींचे कर्जवाटप केले आहे. शेतकऱ्यांकडे १२६८ कोटींचे पीक कर्ज थकीत आहे. शासनाला यापूर्वीच अहवाल सादर केला आहे. थकीत कर्जामुळे नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. याविषयी शासनाला मार्गदर्शन मागितले आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक