तीन पोेलीस, एक आरसीपी, सहा एसआरसीएफ जवानांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:38+5:30

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्तावर गेलेल्या अमरावती राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)च्या सहा जवानांना तेथेच ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्यांच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर ते बरे झाले. अमरावतीत परतल्यानंतर त्यांना एसआरपीएफच्या हद्दीतच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची पुन्हा चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आल्याने सदर जवानांचे वरिष्ठांनी स्वागत केले.

Three policemen, one RCP, six SRCF personnel were infected | तीन पोेलीस, एक आरसीपी, सहा एसआरसीएफ जवानांना लागण

तीन पोेलीस, एक आरसीपी, सहा एसआरसीएफ जवानांना लागण

Next
ठळक मुद्देनागरिकांकरिता लढा । १० कोरोनाग्रस्तांपैकी सात जण ठणठणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जनतेच्या सुरक्षेकरिता ‘कोरोना वारियर्स’ म्हणून महत्त्वाची भूमिका निभावताना जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचारी, एक आरसीपी पथकातील कर्मचारी व सहा एसआरपीएफच्या जवानांना ‘कोरोना’ची बाधा झाली होती. त्यापैकी सात जणांचे अहवाल निगेटिव्ह येऊन ते ठणठणीत झाले आहेत. इतरांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्तावर गेलेल्या अमरावती राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)च्या सहा जवानांना तेथेच ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्यांच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर ते बरे झाले. अमरावतीत परतल्यानंतर त्यांना एसआरपीएफच्या हद्दीतच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची पुन्हा चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आल्याने सदर जवानांचे वरिष्ठांनी स्वागत केले.
दोन आठवड्यांपूर्वी अचलपूर तालुक्यातील परतवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत एका ४६ वर्षीय कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला असून, ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यानंतर १२ दिवसांपूर्वी पॅराडाईज कॉलनी येथील रहिवासी तसेच गाडगेनगर पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉडमध्ये कार्यरत एका ४५ वर्षीय पोलीस जमादाराला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी व मुलाचादेखील अहवालह पॉझिटिव्ह आला होता. या सर्वांना नागपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लवकरच त्यांना डिसचार्जसुद्धा मिळाल्याची माहिती आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नागपुरीगेट हद्दीत कंटेनमेंट झोनमध्ये कर्तव्यावर असलेल्या दंगा नियंत्रण पथक (आरसीपी)च्या २३ वर्षीय कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावरही उपचार सुरू आहे. तसेच शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खोलपुरीगेट पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत तसेच बुधवारा ते दहिसाथ मार्ग स्थित रहिवासी ३२ वर्षीय पोलीस कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस प्रशासन व इतर विभागातील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी सात जण ठणठणीत बरे झाले आहे. इतरही तिघे कोरोनावर मात करतील, असा विश्वास पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Three policemen, one RCP, six SRCF personnel were infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.