शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांसह तिघांचे नगरसेवकपद धोक्यात ?

By admin | Updated: May 19, 2016 00:07 IST

नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, नगरसेवक गोपाल तिरमारे, भय्या लंगोटे या तिघांचे नगरसेवक पद डावावर लागले आहे.

आज निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलणार चांदूरबाजार : नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, नगरसेवक गोपाल तिरमारे, भय्या लंगोटे या तिघांचे नगरसेवक पद डावावर लागले आहे. प्रहार गटनेत्याकडून पक्षादेश झुगारल्याचा आरोप करण्यात आला असून आरोप सिध्द झाल्यास तिघांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.याबाबत जिल्हाधिकारी गुरूवार १९ मे रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांविरूध्द निर्णय दिल्यास त्यांना नगरसेवक पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्यामुळे नांगलिया यांचे नगराध्यक्षपद देखील पणास लागले आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उत आला आहे. २९ आॅक्टोबर २०१५ रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपरोक्त तिघांनी प्रहार पक्षाचा पक्षादेश झुगारून अध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उघड बंड पुकारले होते. यावेळी मनीषा नांगलिया या प्रहारच्या बंडखोर अध्यक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांना प्रहारचे तत्कालीन सदस्य, नगरसेवक तिरमारे व लंगोटे यांनी सहकार्य केले होते. त्यामुळे या तिघांनीही पक्षादेश (व्हीप) झुगारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.प्रहारच्या पराभूत अधिकृत उमेदवार सुनीता गणवीर व गटनेते अ.रहेमान शे.इब्राहिम यांनी या तिन्ही नगरसेवकांविरोधात तक्रार करून त्यांना नगरसेवकपदावरून निष्कासित करण्याचे अपील २९ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले होते. याप्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी दोन्ही पक्षांना गुरूवार १९ मे ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १८६५ मधील, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अटी व नियमांतर्गत कलम ७ नुसार हे अपील सादर करण्यात आले होते. अपिलावरील निर्णय तुर्तास तरी गुलदस्त्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय बंडखोर प्रहार नगरसेवकांच्या विरोधात गेल्यास तो त्यांच्याकरीता जबरदस्त हादरा असेल. या प्रकरणाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी तो निर्णय तालुकाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे हे निश्चित.चांदूरबाजार शहर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून दिग्गज नेत्यांचा बालेकिल्ला आहे. येथील कुठलीही निवडणूक असो, ती जिल्ह्याच्या पटलावर गाजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे येथील नगराध्यक्षांवर केलेला आरोप कितपत सत्य आहे, हे येणारी वेळच सांगणार आहे. (तालुका प्रतिनिधी)