शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नऊ कोटींच्या कामांना मान्यता नाही

By admin | Updated: October 24, 2015 00:09 IST

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे ..

जिल्हा परिषद : जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात निर्णयअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे कामनिहाय मंजूर केली होती. मात्र, या यादीला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी विरोध करून ही यादी रद्द केल्याचा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन सभागृहाने सदर यादीतील कामावर एकमताने शिक्कामोर्तब केले. परंतु आता याबाबतचा अंतिम निर्णय हा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारीच यादीला नव्याने मान्यता कधी मिळणार याची प्रतीक्षा करीत आहेत.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामे ही विविध यंत्रणांकडे सोपविली होती. यासाठी गावनिहाय कामे मंजूर करून या कामांची यादी संबंधित विभागाकडे पाठविली होती. यापैकीच जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला तलावातील गाळ काढण्यासाठी सुमारे नऊ कोटी रूपयांच्या निधीचा कामे पूर्ण करण्यासाठी दिला होता. मात्र जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना यामध्ये विश्र्वासात न घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली ही यादी रद्द करण्याचा ठराव जलव्यवस्थापन, सर्वसाधारण सभेत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ठराव पाठविला होता. मात्र जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून ही कामे जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या यादीनुसार करू द्यावीत, असा आग्रह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा होता. यावर शेवटी दोन सभांमध्ये विस्तृत चर्चा केल्यानंतर जिल्ह्याचा विकासाचा हा प्रश्न लक्षात घेता यापुढील जलयुक्त शिवारच्या कामात जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांच्या सहमतीने सर्कलनिहाय मागवून या कामाची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून यामधील कामे घेण्याबाबत त्यांना विनंती करू, असे मत मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मांडले. ही बाब लक्षात घेऊन अखेर जलयुक्त शिवारच्या सुमारे नऊ कोटींच्या कामांना जिल्हा परिषद सभागृहाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु यापूर्वी जो जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आलेला ठराव जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे याचा कामांचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार असल्याने त्यांच्या निर्णयाची जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. (प्रतिनिधी)