शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढले थायरॉईडचे रूग्ण

By admin | Updated: October 6, 2015 00:20 IST

आयोडीनच्या कमतरतेमुळे गळ्याला होणारा आजार म्हणजे थायरॉईड.

शंभरातले चार रुग्ण पॉझिटिव्ह : प्रतिबंधात्मक उपायांची गरज संदीप मानकर अमरावतीआयोडीनच्या कमतरतेमुळे गळ्याला होणारा आजार म्हणजे थायरॉईड. या आजाराच्या प्रमाणात जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यात प्रत्येक १०० रुग्णांमागे ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. या आजारावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी ही माहिती दिली. शरीरात थायरॉईड ग्रंथी असते. ती टी-३ व टी-४ हार्मोन्स तयार करते. परंतु हार्मोन्स तयार करण्याची ही प्रक्रिया कमी झाल्याने गळ्याभोवती आधी छोट्या गाठी तयार होतात व नंतर गलगंड होतो. हा थायरॉईडचा पुढचा प्रकार आहे. पूर्वी हिमालय पर्वताच्या परिसरात आयोडीनच्या कमतरतेमुळे या आजारांचे रुग्ण आढळत होते. आता ग्रामीण भागातही हा आजार फोफावला आहे. ४० ते ५० वर्षे वयोगटातील रुग्णांना साधारणत: हा आजार होतो. पण, अलिकडच्या काळात तरुणांनाही या आजाराने घेरले आहे.थायरॉईडची लक्षणेलठ्ठपणा, वजन कमी होणे, घाबरणे किंवा कंप सुटणे, थकवा, नैराश्य, गळ्याभोवती सूज येणे, आवाज घोगरा होणे, थंडी किंवा गरमी सहन न होणे तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता ही आजाराची लक्षणे आहेत. रक्त चाचण्यांमधून आजाराचे निदानटी-३, टी-४ तसेच टी.एस.एच. या रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर या आजाराचे निदान होते. पॅथॉलॉजी किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे गरजेचे आहे.१०० रुग्णांमागे २ ते ४ रुग्ण १०० रुग्णांमागे २ ते ४ रुग्ण थायरॉईड या आजाराने पॉझिटिव्ह आढळत आहेत. योग्य वेळी उपचार केल्यास हा आजार बरा होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. हा आजार अनुवंशिकही असू शकतो.- प्रवीण बिजवे, चिकित्सक.थॉयरॉईडच्या आजारावर रुग्णांना होमिओपॅथी पध्दतीने उपचार केले जातात. अलीकडेच नि:शुल्क थायरॉईड उपचार शिबिर घेण्यात आले आहे.- मोईन परवेज,एम.डी. (होमिओपॅथी).