शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अंबादेवी संस्थान विश्वस्तांना उपस्थित राहण्याची तिसरी संधी

By admin | Updated: December 15, 2015 00:07 IST

एकवीरा व अंबादेवी मंदिराच्या जागेचा वाद व पत्रिका वाटून महाप्रसादाचे आयोजन केल्यासंदर्भात न्यास नोंदणी कार्यालयामार्फत अंबादेवी संस्थानाला नोटीस बजावण्यात आली होती.

अमरावतीकर निर्णयाच्या प्रतीक्षेत : पत्रिका देऊन महाप्रसाद वितरित केल्याचे प्रकरणअमरावती : एकवीरा व अंबादेवी मंदिराच्या जागेचा वाद व पत्रिका वाटून महाप्रसादाचे आयोजन केल्यासंदर्भात न्यास नोंदणी कार्यालयामार्फत अंबादेवी संस्थानाला नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये पाच विश्वस्तांना संबंधित प्रकरणासंदर्भात कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मात्र, आतापर्यंत दोनदा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता १५ डिसेंबर ही तिसरी तारीख विश्वस्तांना देण्यात आली असून ती शेवटची संधी राहण्याची शक्यता आहे. अंबादेवी संस्थानच्या व्यापारी संकुलातील प्रतिष्ठान अगदी एकवीरा देवीच्या दर्शनी भागासमोरच उभारण्यात आले आहे. त्यामुळे एकवीरा देवी मंदिराचा दर्शनी भाग झाकला गेला आहे. यासंदर्भात एकवीरा देवी संस्थानतर्फे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात तक्रार दिली आहे. त्यातच नवरात्रौत्सवात अंबादेवीसह एकवीरा देवी संस्थानने महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या पत्रिका छापून जवळच्या नागरिकांनाच आमंत्रण दिले होते. त्यामुळे अनेक भाविकांना महाप्रसादापासून वंचित राहावे लागले. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच हजारो भाविकांनी वृृत्ताला समर्थन दर्शवून महाप्रसाद सर्व भक्तांसाठी खुला करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात धर्मदाय सहआयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यावर निरीक्षकांनी चौकशी सरू केली. या चौकशीत अंबादेवी संस्थान सहकार्य करीत नसल्याचे लक्षात आल्यावर विश्वस्तांना नोटीस बजावण्यात आली. अंबादेवी संस्थानने या प्रकरणाची कागदपत्रे घेऊन धर्मदाय सहआयुक्तांकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर न करता उपस्थिती सुध्दा दर्शविली नाही. यासंदर्भात विश्वस्तांना उपस्थित राहण्याकरिता दोनदा तारीख देण्यात आली. मात्र, विश्वस्तांनी स्वत: उपस्थित न राहता वकीलपत्र सादर केले. दोनदा तारखा दिल्यानंतरही अंबादेवी संस्थानचे विश्वस्त आतापर्यंत तारखेवर हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना तिसरी तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे १५ डिसेंबरला निश्चित केलेल्या तिसऱ्या तारखेला अंबादेवी संस्थान पदाधिकारी उपस्थित राहतील का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)एकवीरा व अंबादेवी संस्थानच्या जागेच्या वादाचे प्रकरण धर्मदाय सहआयुक्तांकडे न्यायप्रविष्ट आहे. सोबतच पत्रिकांचे वाटप करून महाप्रसाद वितरित करण्याच्या प्रकरणाची चौकशीही केली जात आहे. संस्थानाला दोनदा तारीख देऊन हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा तिसरी तारीख देण्यात आली आहे. -आर.ए. गुल्हाने, निरीक्षक.