शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्र्याला मातीमोल भाव; खर्च ४४ हजार, उत्पन्न ४० हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 01:05 IST

प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्र्याला मातीमोल भाव

- गणेश देशमुखअमरावती : एका एकराला ४४ हजार रुपयांचा खर्च आणि ४० हजार रुपयांचे उत्पन्न - हा हिशेब लिहिलाय विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या डायरीत. होय! ‘नागपुरी संत्री’ अशी जगभर ख्याती असलेल्या संत्राफळाचे लाखभर उत्पादक जगायचे कसे, या विचाराने धास्तावले आहेत.विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा, वर्धा आणि नागपूर या सात जिल्ह्यांत संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. या प्रांतातील १,२६,००० हेक्टर अर्थात ३,१५,००० एकर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. तज्ज्ञांनुसार, सरासरी एक लाख शेतकरी. अर्थात, सुमारे पाच लाख शेतकरी कुटुंबीय या फळपिकावर अवलंबून आहेत. आंबिया बहराची संत्री दोन महिन्यांपूर्वी विक्रीला आली, तीच मुळी कोसळलेले भाव घेऊन. 

का काेसळले भाव?

तुलनेने अधिक उत्पादन झाले. ५० एमएम आकारापेक्षा लहान संत्री (टुल्ली) प्रक्रियेसाठी वापरली जातात. त्यापेक्षा मोठ्या आकाराची खाण्यासाठी (टेबल फ्रुट) विकली जातात. केरळ, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा ही राज्ये ‘टेबल फ्रुट’ची मुख्य ग्राहक आहेत. तेथे सातत्याने पाऊस राहिल्याने मागणी नव्हती. राजस्थान आणि मध्य प्रदेशात संत्रा लागवड क्षेत्र वाढले. त्यामुळे पूर्वी ३० ते ४० हजार रुपये प्रतिटन अशी मागणी असणारी संत्री आज १० हजार रुपये प्रतिटन या भावाने विकली जात आहेत. 

प्रक्रिया २०० टनांवर, उत्पादन ५,००० टनांचेसंत्र्याचे दोन बहर आहेत - आंबिया (आक्टोबर ते डिसेंबर) आणि मृग (फेब्रुवारी, मार्च). दोन्ही बहराचे विदर्भातील एकूण सरासरी उत्पादन १२,६०,००० टन आहे. त्यातील ३० टक्के फळे ‘टुल्ली’ असतात. हल्ली नांदेडच्या एका खासगी प्रक्रिया प्रकल्पात २०० टन प्रति दिवस इतकी संत्री खरेदी केली जातात. विदर्भात दररोज पाच हजार टन संत्र्यांवर प्रक्रिया होईल, इतक्या क्षमतेची प्रक्रिया केंद्रे हवीत. 

टॅग्स :Amravatiअमरावती