शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

टेलिमेडिसीन सेंटर आदिवासींसाठी संजीवनी

By admin | Updated: December 14, 2015 00:16 IST

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसीनच्या कामकाजाची पाहणी केली.

आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वैद्यकीय सल्लाअमरावती : आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसीनच्या कामकाजाची पाहणी केली. मेळघाटातील वीज व संवादाची अडचण लक्षात घेता शासनाने मेळघाटातील माता, बालमृत्यूचे प्रमाण कमी करून सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्धीसाठी टेलिमेडिसीन सेंटर सुरू केले आहे. या केंद्रात अद्ययावत उपकरणे बसविण्यात आली असून याव्दारे दुर्धर आजारावर मुंबई, नागपूर, पुणे तसेच अन्य ठिकाणाच्या सर्जनशी संवाद साधून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे वैद्यकीय सल्ला घेण्यात येतो. मुंबई येथील संदीप राणे, अवस्थी, स्वनिश सावंत या सर्जनशी संवाद साधून सहा रुग्णांच्या दुर्धर आजारावरील सल्ला घेण्यात आला. यातील २-३ रुग्णांना तातडीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार करण्याचे निर्देश दीपक सावंत यांनी दिले.यावेळी आ. प्रभुदास भिलावेकर, नागपूरचे सर्जन दंदे, आरोग्य संचालक सतिश पवार, अतिरिक्त संचालक अर्चना पाटील, सीईओ सुनील पाटील, आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत, निकम, सतीश हुमणे, नेत्रतज्ञ कांचन जवंजाळ, वैद्यकीय अधिकारी पी.एन. गोरडे, बालरोगतज्ज्ञ जावरकर, टेलिमेडिसीनच्या प्रकल्प व्यवस्थापक राजर्षी गुरव, विनोद मेहेत्रे, शिवराय महादेवकर, गजानन नवलकर, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संदीप पाटील आदी उपस्थित होते. मेळघाटामध्ये आरोग्य शिक्षणाबद्दल अंधश्रद्धा अधिक आहे. स्थलांतराचा प्रश्न सोडविण्यासाठी मजुरांना मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या सूचना केल्या. आरोग्य सेवेबाबत जनजागृतीमुळे ७५ टक्के आदिवासी आरोग्य केंद्रांचा लाभ घेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील साधन सामुग्री अद्ययावत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्यात. टेलिमेडिसीन सेंटरव्दारे आतापर्यंत ५० हून अधिक रुग्णांना दुर्धर आजारावरील सल्ला दिल्याची व उपचार केल्याची माहिती या केंद्राव्दारे मिळत असल्यामुळे रुग्ण दगावत नाही. मेळघाटात शासनाने टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध केल्यामुळे आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)