शिक्षण ऑनलाईन; पुस्तके लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:11+5:30

शाळा बंद होऊन दोन महिने झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला. काही विद्यार्थी व शिक्षक नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून ऑनलाइन शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांकडे पेन, पेन्सिल, पुस्तके, वह्या, तसेच शालेयपयोगी वस्तू संपल्यात. ऑनलाइन शिक्षण आहे, पण पुस्तके नाहीत, अशी विद्यार्थ्यांची स्थिती आहे.

Teaching online; Books lockdown | शिक्षण ऑनलाईन; पुस्तके लॉकडाऊन

शिक्षण ऑनलाईन; पुस्तके लॉकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : कोरोनाच्या वाढते संसर्गामुळे काही शाळांनी अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन धडे देणे सुरू केले असले, तरी त्यासाठी आवश्यक पुस्तके मात्र दुकाने बंद असल्याने मिळेनाशी झाली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी अ‍ॅप व त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असल्याने त्यालाही मर्यादा आल्या आहेत.
शाळा बंद होऊन दोन महिने झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला. काही विद्यार्थी व शिक्षक नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून ऑनलाइन शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांकडे पेन, पेन्सिल, पुस्तके, वह्या, तसेच शालेयपयोगी वस्तू संपल्यात. ऑनलाइन शिक्षण आहे, पण पुस्तके नाहीत, अशी विद्यार्थ्यांची स्थिती आहे. त्यापेक्षा बिकट परिस्थिती ग्रामीण विद्यार्थ्यांची आहे. या विद्यार्थ्याकडे शिक्षणाचे धडे घेण्यासाठी कुठल्याही सुविधा नाहीत. ‘ना शाळा न ऑनलाइन शिक्षण’ केवळ खेळ व टीव्ही असा त्यांचा दिनक्रम बनला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता सरकारने ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांची व्यथा : नेटचाही खोडा
जीवनावश्यक वस्तू म्हणून आजघडीला सिमेंट, लोहा, मद्य मिळते. मात्र, शालेय वस्तू, पुस्तकांची दुकाने बंद आहेत.
- विनोद गेडाम, शिक्षक, मोर्शी

Web Title: Teaching online; Books lockdown

टॅग्स :onlineऑनलाइन