शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारी राज्यभरातील शिक्षकांचा एल्गार

By admin | Updated: November 17, 2015 00:21 IST

स्व. विजय नकाशे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसह विविध समस्यांच्या निपटाऱ्यासाठी राज्यभरातील शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे.

विविध समस्यांचा समावेश : मुंबईत धरणे, अमरावतीत समन्वय बैठकअमरावती : स्व. विजय नकाशे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसह विविध समस्यांच्या निपटाऱ्यासाठी राज्यभरातील शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. बुधवार १८ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये १८ शिक्षक संघटनाचा समावेश असलेल्या समन्वय समितीची बैठक होत आहे. तर आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यभरातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानात ‘धरणे आंदोलन करणार आहे. एकंदरीतच विजय नकाशे यांच्या क्लेशदायी आत्महत्येच्या घटनेनंतर शिक्षण वर्तुळात खळबळ माजली आहे आणि अशैक्षणिक कामांचा विरोध म्हणून राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.समन्वय समितीची बैठक‘नको ती अशैक्षणिक कामे’ असा एल्गार पुकारत राज्यभरातील शिक्षक संघटना समान न्यायासाठी एकत्र आल्या आहेत. १८ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत राजापेठ स्थित हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. अमरावतीत होणाऱ्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत शिक्षकांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे काढून घेत त्यांना फक्त अध्यापन करु द्या, अशी आग्रही मागणी या बैठकीतून करण्यात येणार आहे. समन्वय समितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, म. रा. शिक्षक सेना, पुरोगामी शिक्षक संघटना शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट), शिक्षक संघ, ग्रेड मुख्याध्यापक संघटना, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक सभा, आदिवासी शिक्षक सभा यासह राज्यभरातील लहान-मोठ्या १८ शिक्षक संघटनाचे पदाधिकारी यात एकत्र आले आहेत. शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर या बैठकीत मंथन होणार आहे. यातच पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरविली जाणार आहे. ‘डिसीपी’ योजनेतील हिशेब द्यापरिभाषित अंशदायी निवृत्ती योजना ‘डीसीपीएस’ मधील हिशोब मिळवा, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय भवनासमोर लाक्षणिक आंदोलन करणार आहे. १८ नोव्हेंबरला होत असलेल्या या आंदोलनात ५०० पेक्षा अधिक शिक्षक सहभागी होणार आहेत. १ नोव्हेंबर २००५ नंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना त्यांच्या वेतनातून कपात झालेल्या रकमांची विवरणपत्रे किंवा जमा रकमांचा हिशेब देण्यात आला नाही. सदर कपातीची विवरणपत्रे देण्यासाठी केलेल्या मागणीकडे होत असलेल्या सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करीत असल्याचे माहिती शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली. (प्रतिनिधी)