शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या शिक्षिकेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

जियाउल्ला खान व फिरदौसची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत यांनी बाजू मांडून दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मदरसा शनिवारपासून सुरू होणार आहे. मुली मदरशात आल्यावर त्यांचे बयाण नोंदवायचे आहे.

ठळक मुद्देआणखी मुलींचे बयाण नोंदविणार : आरोपी जियाउल्ला खानला २०, फिरदौसला २२ पर्यंत कोठडी

अमरावती : लालखडी स्थित मदरशाचा अध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानच्या समर्थनार्थ मुलींचे व्हिडीओ व्हायरल करणाºया शिक्षिकेस नागपुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. महवीश खान अहमद खान (२०, रा. नेरपिंगळाई) असे महिला आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी मुख्य आरोपी जियाउल्ला खानला २० नोव्हेंबर, तर त्याची सहकारी फिरदौसजहाँला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.जियाउल्ला खान व फिरदौसची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत यांनी बाजू मांडून दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मदरसा शनिवारपासून सुरू होणार आहे. मुली मदरशात आल्यावर त्यांचे बयाण नोंदवायचे आहे. पीडित मुलीचे नाव उघड केलेला व्हिडीओ व्हायरल करणाºया महिलेची चौकशी करायचा आहे. जियाउल्ला खान, फिरदौस व ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी करायची आहे, असे मुद्दे पोलिसांकडून सरकारी पक्षाने न्यायालयासमक्ष मांडून आरोपींची कोठडीची मागणी केली.दरम्यान, नागपुरी गेट पोलिसांनी या प्रकरणात महवीशविरुद्ध कलम २३ पोक्सो वाढविले आहे.आवाजावरून शिक्षिकेची ओळखमुफ्ती जियाउल्ला खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ मदरशातील काही मुलींचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत चक्क पीडित मुलीचे नाव उघड करण्यात आले होते. आवाजावरून शोध घेऊन पोलिसांनी महवीश खान या शिक्षिकेला शुक्रवारी अटक केली.पीडितीचे बयाण नोंदविलेलैंगिक अत्याचार झालेली पीडित १५ वर्षीय मुलगी बयाण देण्यास असमर्थ होती. त्यामुळे तीचे बयाण पोलिसांनी नोंदविले नव्हते. शुक्रवारी पीडित मुलीचे कलम १६४ अन्वये न्यायालयासमक्ष बयाण नोंदविण्यात आले.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हा