टोळधाडीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:01:17+5:30

मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना, मार्गदर्शन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Take immediate measures to control locusts | टोळधाडीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करा

टोळधाडीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश: वरुड, मोर्शी भागात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही टोळधाड दूरवर उडत जात असल्याने तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदीचा फडशा पाडते. या किडीचा प्रादुभार्वामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वरूड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यावर कृषी विभागाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली तात्काळ फवारणी आदी उपाय करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना, मार्गदर्शन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले की, टोळधाडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यात वरूड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात टोळधाडीच्या आक्रमणाने शेतकरी चिंतीत झाले आहेत. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी कृषी विभागाकडून जाहीर केलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या उपाययोजना करण्याचे आवाहन
वरुड तालुक्यातील पाळा, उमरखेड, गव्हाणकुंड, हिवरखेड या गावांमधून टोळधाडीचा एक थवा स्थलांतरीत होताना कृषी विभागाला आढळून आला आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अंतर्गत प्रामुख्याने टिनाचे डबे, ढोल वाजविणे, ट्रॅक्टर व मोटरसायकलचे सायलेन्सर काढून शेतात मोठ्याने आवाज करून किडीला हूसकावून लावावे. क्लोरोपायरीफॉस व मेल्यॉथिआॅन या किटकनाशकाची फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वरूड तालुक्यात पिकांवर फवारणी
वरुड तालुक्यातील पुसला, खापरखेडा या शिवारात सायंकाळी या किडीचा थवा थांबलेला आढळल्याने त्यावर ट्रॅक्टर माऊंट स्प्रेअर, अग्निशमन बंबाच्या साहाय्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली फवारणी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजल्यानंतर टोळधाड उंच झाडांवर स्थिरावते. अशा स्थिरावलेल्या थव्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कळवून त्यांच्या देखरेखीखाली सामूहिक फवारणी अग्निशमन बंबाच्या साहाय्याने करावी. ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर माऊंट स्प्रेअर, पॉवर स्प्रेअर, एचटीपी स्प्रेअर फवारणीचे विविध यंत्र उपलब्ध असल्यास त्यांनी फवारणीचे यंत्र सज्ज ठेवून फवारणीसाठी इतरांनाही साहाय्य करावे.

Web Title: Take immediate measures to control locusts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.