शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ताडी ४७ लाखांची !

By admin | Updated: October 14, 2015 00:28 IST

एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वर्षांनंतर जिल्ह्यातील १७ ताडी दुकानांची लिलाव प्रक्रिया मंगळवारी पार पडली.

१२ वर्षांनंतर लिलाव : १७ दुकानांची बोली, ५५ व्यापाऱ्यांचा सहभागअमरावती : एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वर्षांनंतर जिल्ह्यातील १७ ताडी दुकानांची लिलाव प्रक्रिया मंगळवारी पार पडली. यात राज्य उत्पादन शुल्क विभागात ४७ लाख ४६ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील ‘अण्णां’नी ठिय्या मांडला होता, हे विशेष.ताडी विक्रीचा व्यवसाय करणारे केवळ आंध्र प्रदेशातील ‘अण्णा’ हेच आहेत. या व्यवसायानिमित्त राज्यात वास्तव्यास असलेल्या ‘अण्णा’ंनीच लिलावात सहभाग घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडली. यासाठी शासनाला १९ लाख ७३ हजार रुपये येणे अपेक्षित होते. दुकाननिहाय स्पर्धात्मक पद्धतीने ‘अण्णां’नी बोली लावली. यासाठी राज्यभरातून ‘अण्णा’ आले असले तरी ही दुकाने विदर्भातील अण्णांनी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले. लिलावात एकूण ५५ जणांनी सहभाग घेतल्याची नोंद एक्साईजमध्ये आहे. ताडी दुकाने ताब्यात घेण्यासाठी ‘अण्णां’नी केलेली स्पर्धा लक्षवेधी ठरली. लिलाव प्रक्रियेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याध अधीक्षक उषा वर्मा यांच्यासह निरीक्षक एस. एन. केडीया, एस. एस. लांडगे, दुय्यम निरीक्षक एस. एस. रंधे, ए. एम. शेख, जी. एस. सिरसाम आदी उपस्थित होतेअशी तयार होते ताडीताडी हे पेय ठराविक व्यक्तीच प्राशन करतात. सिंदी वृक्षापासून ताडी तयार केली जाते. सायंकाळच्या सुमारास सिंदी वृक्षाला छेद करून त्यातून निघणारा अर्क मडक्यात गोळा करतात. सकाळी ते ताडी स्वरुपात विकले जाते. ताडी काही प्रमाणात नशा देते, असे प्राशन करणारे सांगतात.या दुकानांसाठी लिलावजिल्ह्यातील १७ ताडी दुकानांसाठी मंगळवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात येथील बेलपुरा, मसानगंज, बडनेरा, चांदूरबाजार, परतवाडा, शेंदुरजनाघाट, चांदुर रेल्वे, वरुड, अंजनगाव सुर्जी, नांदगाव खंडेश्वर, चिखलदरा, टेंभुसोंडा, धारणी, हरिसाल येथील दुकानांचा समावेश आहे.शासनाच्या आदेशानुसार ताडी दुकानांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. १२ वर्षांपूर्वी ताडी विक्रीला लगाम लावण्यात आला होता. त्यावेळी सिंदीचे वृक्ष नव्हते. मात्र आता हे वृक्ष असल्याचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्या आधारावरच ही प्रक्रिया पार पडली.- उषा वर्मा, अधीक्षक, राज्य उत्पादक शुल्क विभाग, अमरावती.