देशभक्तीपर गीत स्पर्धेत जनता शिक्षण संस्थेचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:57+5:302021-02-05T05:32:57+5:30

शेंदूरजनाघाट : क्रांतिसूर्य बहुउद्देशीय संस्था व वरूड येथील युवा व्यापारी संघ यांच्यातर्फे आयोजित 'मेरे वतन २०२१' या देशभक्तीपर गीत ...

Suyash of Janata Shikshan Sanstha in the patriotic song competition | देशभक्तीपर गीत स्पर्धेत जनता शिक्षण संस्थेचे सुयश

देशभक्तीपर गीत स्पर्धेत जनता शिक्षण संस्थेचे सुयश

शेंदूरजनाघाट : क्रांतिसूर्य बहुउद्देशीय संस्था व वरूड येथील युवा व्यापारी संघ यांच्यातर्फे आयोजित 'मेरे वतन २०२१' या देशभक्तीपर गीत स्पर्धेत जनता शिक्षण संस्थेच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी यश मिळविले. वरूड येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही स्पर्धा पार पडली.

इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थी गटात जनता गर्ल्स हायस्कूलची सातवीची विद्यार्थिनी मृणाल पांडे द्वितीय आली. नववीपासूनच्या खुल्या गटात श्री एन.जी. मोघे कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी (कला) ची विद्यार्थिनी रीतू आठनेरे हिला प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. याच गटात जनता गर्ल्स हायस्कूलचे सहायक शिक्षक उमेश काळे यांना प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश काळे, अरुण काळे, उपाध्यक्ष सतीश सोलव, सचिव मोहन गणोरकर, सहसचिव चंद्रशेखर टाकरखेडे, संचालक दिवाकरराव वऱ्होकर, राजेंद्र बेलसरे, अरुण फुटाणे, संजय बेले, निमंत्रित संचालक प्रभाकर सावरकर, मुख्याध्यापक माया हिवसे, पर्यवेक्षक नीलिमा अंबाडकर आदींनी त्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

Web Title: Suyash of Janata Shikshan Sanstha in the patriotic song competition