शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर राइझिंग स्टार्स’, गायकांना पर्वणी

By admin | Updated: January 23, 2017 00:12 IST

कलर्स व लोकमत सखीमंचद्वारे २५ जानेवारीला स्थानिक अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, अमरावती येथे दुपारी ४.३० वाजता ‘सूर राइझिंग स्टार्स’चे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२५ जानेवारीला स्पर्धा : कलर्स, लोकमत सखीमंचचा कार्यक्रमअमरावती : कलर्स व लोकमत सखीमंचद्वारे २५ जानेवारीला स्थानिक अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, अमरावती येथे दुपारी ४.३० वाजता ‘सूर राइझिंग स्टार्स’चे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत १८ वर्षांच्यावरील कोणीही स्त्री-पुरूष गायक सहभागी होऊ शकतात. प्राथमिक फेरी २५ जानेवारीला दुपारी १ वाजता अभियंता हॉलमध्येच आयोजित करण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतील निवडक स्पर्धकांचा अंतिम फेरीत होणारा कलाविष्कार म्हणजेच ‘सूर राइझिंग स्टार्स’चे याकार्यक्रमाच्या माध्यमातून राइझिंग स्टार्स जगाला दिसणार आहेत. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आयुष्यातील प्रत्येक भावनांचे रंग टिपून त्या भावनांचे एका वेगळ्या रंगात मालिकांद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. लोकमत सखीमंचची देखील १६ वर्षांपासून अशीच घोडदौड सुरू आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी राइझिंग स्टार्सच्या या गायन स्पर्धेचे आयोेजन करण्यात आले आहे. कलर्स चॅनलवर येणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित होईल. इतर शोप्रमाणे परीक्षकांसमोर येऊन कलाकारांना गाणे सादर करायचे नसून त्यांचा परफॉर्मन्सबघून जनतेला वोटिंग करायचे आहे. वोट करणाऱ्याचा चेहरा देखील स्क्रिनवर दिसेल. विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर, अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज हे सेलिब्रिटी जजेस आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती (९८५०३०३०४०८७) यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)