शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

By admin | Updated: May 3, 2016 00:23 IST

संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील पाच आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळालेला आहे.

अमित हत्याकांड : ६ मे तारीख, २ आरोपीविरुध्द गृहमंत्रालयात परवानगीअचलपूर : संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील पाच आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळालेला आहे. पैकी तीन आरोपींचा मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून अजून एका आरोपीसाठी जामीन विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अचलपूरच्या गुन्हेगारी जगताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.अचलपूर येथे ११ आॅगस्ट रोजी रेती तस्करी करणाऱ्या बारुद गँगने भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर अमित बटाऊवाले या युुवकाची हत्या करून त्याचे वडील मोहन यांना गंभीर जखमी केले होते. या हत्येने अचलपूर-परतवाडा शहरासह संपूर्ण तालुका हादरला होता. यातील १५ आरोपींना मोठ्या शिताफीने अणि आपले कसब पणाला लावून ठाणेदार नरेंद्र ठाकरे व तपास अधिकारी असलेले ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आखरे यांनी टप्प्याटप्प्याने अटक केली होती. मागील सहा-सात महिन्यांपासून ते अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. पैकी मो.शारीक अब्दूल रहमान, मो.मतीन याला फेब्रुवारीत, तर मो.आदील मो. अन्वर याला २ मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जामीन मंजूर केला होता.पोलिसांनी याविरुध्द सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे एक याचिका दाखल करून मो.शारीक, मो.अश्फाक व मो.मतीन यांचा जामीन रद्द करण्याची विनंती केली आहे. या तिघांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ६ मे ही तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच अर्जदार खान व मो. आदील यांनाही गेल्या मार्च महिन्यात उच्च न्यायालयातून जामीन देण्यात आला होता. याचा जामीन रद्द करण्यासाठी गृहमंत्रालयाकडे, सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. दरम्यान, अचलपूर येथील जिल्हा न्यायालयाने नगरसेवक मो.शाकीर, बब्बू पठाण, मो.आबीद व अन्वरखान यांचा जामीन अर्ज २५ मार्च रोजी फेटाळला असून त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अमित बटाऊवाले हत्याकांड संपूर्ण जिल्ह्यात गाजले असून सरकारतर्फे मुंबई येथील उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.