सुपारी किलरच्या घरांची पोलिसांनी घेतली झडती

By Admin | Updated: May 10, 2014 01:16 IST2014-05-10T01:16:04+5:302014-05-10T01:16:04+5:30

नंदनवन कॉलनीतील रहिवासी नितीन हिंगासपुरे यांची हत्या करणारे सुपारी किलर समीर ऊर्फ अब्दुल गनी अब्दुल नजीर..

Supari Killer's houses are taken by the police | सुपारी किलरच्या घरांची पोलिसांनी घेतली झडती

सुपारी किलरच्या घरांची पोलिसांनी घेतली झडती

डीएडच्या अभ्यासक्रमाला शिकत होती मेघा
बडनेरा : नंदनवन कॉलनीतील रहिवासी नितीन हिंगासपुरे यांची हत्या करणारे सुपारी किलर समीर ऊर्फ अब्दुल गनी अब्दुल नजीर (२६, रा. काजीपुरा, कारंजा लाड), आनंद रमेश गायकवाड (२१) व गजानन महादेव भोंगळे (२0, दोन्ही रा. भारतीपुरा कारंजा लाड) यांच्या कारंजा येथील घरांची पोलिसांनी गुरुवारी झडती घेतली. परंतु त्यांना आरोपीच्या घरुन काहीही मिळाले नाही.
नितीन हिंगासपुरे यांची हत्या करण्याप्रकरणी पोलिसांनी नितीनची चुलत वहिनी मेघा हिंगासपुरे, समीर ऊर्फ अब्दुल गनी, आनंद गायकवाड, गजानन भोंगळे व मेघाचा मामा सूरज गुल्हाने या पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीची संख्या ही पाचच असून यामध्ये अटकेतील आरोपी व्यतिरिक्त इतर कोणाचाही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील ऑटो चालक हा घटनेचा प्रत्याक्षदश्री साक्षीदार असल्याने पोलीसांनी त्याचे बयान नोंदवीले आहे.पोलिसांनी दोन मेमरी कार्ड जप्त केले आहे. यापैकी एका कार्डमध्ये नितीन ने मेघाचे काढलेले फोटो असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
■ मेघाचे माहेरचे आडनाव हे बिच्छुते आहे. तिचे माहेर नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील आहे. सात वर्षांपूर्वी तिचा विवाह शाम हिंगासपुरेसोबत झाला आहे. तिला पाच वर्षे व अडीच वर्षाच्या दोन मुली आहेत. मेघा अमरावतीत डी.एड. करीत होती.
मेघाच्या भावाचे मोठे राजकीय कनेक्शन
■ मेघाला आई - वडील व दोन भाऊ आहेत. यापैकी तिचा एक भाऊ हा नागपूर येथील एका मोठय़ा पुढार्‍यासोबत राहत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.
मेघाची शनिवारी न्यायालयात पेशी
■ मेघा हिंगासपुरेची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Supari Killer's houses are taken by the police