शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचे वाटोळे

By admin | Updated: May 16, 2016 00:05 IST

दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना सकस पोषण आहार मिळावा ...

पोषण आहारासाठी धान्य पुरवठा नाही : विद्यार्थ्यांचीही दांडीजितेंद्र दखने  अमरावती दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना सकस पोषण आहार मिळावा म्हणून शिक्षण विभागाने १६ एप्रिल ते १४ जून दरम्यान ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यांमध्ये खिचडी व इतर मेनू दररोज शिजवून वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र सुट्यांमुळे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हिच बाब शिक्षकांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे. मात्र अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांना शाळेत आणून तांदळाची खिचडी द्यावी, असा फतवा राज्य सरकारने काढला आहे. शाळेत विद्यार्थी येवोत अथवा न येतो शिक्षकांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत संबंधित शाळांमध्ये हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्या असताना देखील शिक्षकांना आपले कर्तव्य निभवावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १४ पंचायत समितीमधील सर्व शाळांमध्ये पोषण आहाराचे वितरण करण्याचे नियोजन आहे.शाळांमध्ये धान्य नसल्याची ओरडजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना दुष्काळामुळे एप्रिल ते जून महिन्यात सुटीच्या कालावधीत शालेय पोषण आहार देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र यासाठी शाळांना धान्य पुरवठाच करण्यात आला नसल्याची ओरड खुद शि़क्षकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)सर्वच शाळांचा समावेशजिल्ह्यातील पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीमधील सर्व विद्यार्थी याशिवाय काही खासगी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांना शासनाकडून दोन महिन्यांचा पोषण आहार यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र याचा लाभ बोटावर मोजण्याइतक्याच ठिकाणी घेताना दिसत आहे. शालेय विद्यार्थ्याना पोषण आहारासाठी धान्यसाठ्याचा काही ठिकाणी तुटवडा असला तरी अशा शाळांना धान्य पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभागाचा पाठपुरावा सुरू आहे लवकरच हा पुरवठा होईल.- एस.एम. पानझाडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)