शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांसाठी चांदूरबाजार तालुक्याला उपविभागाचा दर्जा

By admin | Updated: March 25, 2015 00:15 IST

१ मार्चपासून चांदूरबाजार तालुक्याला उपविभागाचा दर्जा प्राप्त झाला असला तरी हा दर्जा केवळ सात महिन्यासाठी आहे. १ जून २०१४ पासून येथे तहसीलदार म्हणून...

चांदूरबाजार : १ मार्चपासून चांदूरबाजार तालुक्याला उपविभागाचा दर्जा प्राप्त झाला असला तरी हा दर्जा केवळ सात महिन्यासाठी आहे. १ जून २०१४ पासून येथे तहसीलदार म्हणून डॉ. शरद जावडे (परिवेक्षाधिन उपजिल्हाधिकारी) थेट नियुक्ती झाली होती. त्याचा हा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०१५ रोजी संपल्यामुळे त्यांची इतरत्र स्थानांतरण न करता महसूल विभागाने स्थानिक तहसीलमध्येच उपविभागीय अधिकारी म्हणून १ मार्चपासून पुढील सात महिन्यासाठी नियुक्ती केल्याने चांदूरबाजारला उपविभागाचा दर्जा प्राप्त झाला असून या तहसीलमधून अचलपूर उपविभागीय कार्यालयात यापूर्वी केली जात असलेली सर्व कामे आता याच ठिकाणी होऊ लागल्यामुळे लाभार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. या काळात या तालुक्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या वाटप केलेल्या अनुदान वाटपात जिल्ह्यात विक्रम केला असून या तालुक्यातील ४० हजार २७३ शेतकऱ्यांपैकी ३९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा करून ९८.३४ टक्केवारी गाठली आहे. या निधी वाटपाचे नियोजनाचे सुत्र स्वत: जावडे यांनी हाताळून यास सर्वांचे सहकार्य घेतले. अनुदानाची २५ कोटी ५५ लाख ४८ हजार रकमेतून २५ कोटी १३ लाख २७ हजार ५४८ एवढ्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे. १२७३ शेतकऱ्यांचे ४३ लक्ष रूपयाचे शिल्लक असलेले अनुदान खाते नंबराच्या चुकीमुळे शिल्लक असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सात महिने का होईना येथे उपविभागात केली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण, अपील, सिलींगची प्रकरण, झाडे तोडण्याची परवानगी, नॉन क्रिमीलियर तसेच कायदा व सुव्यवस्था प्रकरणे याच ठिकाणी हाताळली जातात. यापूर्वी अचलपूरला जावे लागत होते. (तालुका प्रतिनिधी)