शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मिनांचा पोहरा-चिरोडी जंगलात ‘सर्जिकल स्ट्राईक’

By admin | Updated: October 16, 2016 00:06 IST

अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी शनिवारी १० कि.मी.च्या जंगलात पायी फिरून 'सर्जिकल स्ट्राईक' केले.

दोन अटकेत : २८९ मेंढ्या, ११३ बकऱ्या, १२ वासरे वनविभागाच्या ताब्यात, पशुपालकांचे दणाणले धाबे पोहरा बंदी/अमरावती : अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी शनिवारी १० कि.मी.च्या जंगलात पायी फिरून 'सर्जिकल स्ट्राईक' केले. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली. २८९ मेंढ्या, ११३ बकऱ्या व १२ वासरे ताब्यात घेण्यात आलेत. वनविभागाच्या या कारवाईमुळे पशुपालकांचे धाबे दणाणले आहे. पावसाळ्यात जंगलातील हिरव्यागार वातावरणात अवैध चराईला उधाण येते. सर्व गवत असल्याने जंगलाशेजारी असलेल्या गावांतील मेंढपाळ जनावरे अवैध चराई करण्यासाठी सोडून देतात. दररोज जंगल चराई होत असल्यामुळे नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान होते. वर्षभरात अवैध चराईसंदर्भात अनेकदा किरकोळ कारवाई केली जाते. मात्र, शनिवारी वनविभागाने जंगलात सर्जिकल स्ट्राईक अभियान राबवून वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईची सर्व सूत्रे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी स्वत: सांभाळली. सहायक उपवनसरंक्षक राजेंद्र बोंडे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर, चांदुररेल्वे वनपरिक्षेत्राचे अनंत गांवडे, परतवाडा रेंजचे बारखडे, घागरे, वनपाल विनोद कोहळे, घागरे, वनरक्षक देशमुख, ठाकूर, नैतनवार, महाजन, खडसे, शेंडे, वनमजूर किशोर धोटे, बाबाराव पळसकर, दीपक नेवारे, वानखडे यांच्यासह धाडसी धाडसत्र राबविले. पोहरा जंगलात पायी फिरून चराई करणाऱ्या जनावरांची पाहणी केली. त्यामध्ये कारला बिटमधील पाथरगाव शेजारच्या जंगलातून २८९ मेंढ्या व ४० बकऱ्या ताब्यात घेण्यात आल्या. पशुपालक निंबाजी बिचुकले याला अटक केली. त्याचप्रमाणे वनविभागाच्या अन्य पथकाने भानखेडा जंगलातील ६४ बकऱ्या ताब्यात घेतल्या. येथून गोपाल रामजी चव्हाण याला अटक केली, तर दक्षिण चिरोडीच्या अंबा बिटमधून ९ बकऱ्या व १२ वासरे ताब्यात घेण्यात आल्यात. अज्ञात पशुपालकांचा वनविभागाने शोध चालविला आहे. वनविभागाने आरोपींविरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २६, १ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या जनावरांना कारला येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर जनावरांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. मीना यांच्या धाडसी कारवाईमुळे पशुपालकांसह त्यांच्या अधिनस्थांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)१५ एकरांचे जंगल नष्टवडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील पोहरा, कारला व चिरोडी जंगलात वनविभागाने सर्जिकल स्ट्राईक राबवून तब्बल ४१४ जनावरांना ताब्यात घेतले. ही जनावरे दररोज चराई करीत असल्याचे निदर्शनास आले असून या जनावरांनी तब्बल १५ एकरांचे जंगल चराई करून नष्ट केले आहे. या चराईमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चराईमुळे जंगलातील ग्रेझिंनचे नुकसान होत आहे. नवीन झाडांची वाढ होत नसून ती नष्ट होत आहे. अवैध चराई ही मोठी समस्या असल्याने ही धडक कारवाई करण्यात आली. पुढील काळासाठी नैसर्गिक संपत्ती टिकविणे अत्यावश्यक आहे, तेव्हाच मानवाला शुध्द हवा व पाणी मिळू शकेल. - हेमंतकुमार मीना, उपवनसरंक्षक, वनविभाग, अमरावती