नोकरीच नव्हे, उद्योगांसाठीही अभ्यास महत्त्वाचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:15+5:302021-02-05T05:31:15+5:30

फोटो - चांदूर बाजार ०३ एस चांदूर बाजार : विद्यार्थ्यांनी शिकताना आपली आवड, अभ्यासाची क्षमता ओळखून शिक्षणाची दिशा ठरविणे ...

Study is important not only for jobs but also for industries | नोकरीच नव्हे, उद्योगांसाठीही अभ्यास महत्त्वाचाच

नोकरीच नव्हे, उद्योगांसाठीही अभ्यास महत्त्वाचाच

फोटो - चांदूर बाजार ०३ एस

चांदूर बाजार : विद्यार्थ्यांनी शिकताना आपली आवड, अभ्यासाची क्षमता ओळखून शिक्षणाची दिशा ठरविणे आवश्यक आहे. नोकरी नव्हे, तर उद्योगांसाठीही अभ्यास महत्त्वाचाच आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी कोणते व कसे शिक्षण घेतले पाहिजे याचा विचार करणे ही काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. चांदूर बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्या हस्ते डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन पार पडले.

मंचावर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., नगराध्यक्ष नितीन कोरडे, तहसीलदार धीरज स्थूल ,उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदागीरे, ठाणेदार सुनील किनगे उपस्थित होते. पोलीस ठाण्याच्या परिसरात सभागृह उभारण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणाले, सुरुवातीला तालुकास्तरावर या अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, काही दिवसातच जिल्ह्यातील सर्व ३१ पोलीस ठाण्यांमध्ये या अभ्यासिका उघडण्यात

जातील. ठाणेदार सुनील किनगे प्रास्ताविक व संचालन सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी केले. आभार प्रदर्शन नरेंद्र पेंदोर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Study is important not only for jobs but also for industries