शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

By admin | Updated: September 30, 2014 23:30 IST

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा व युवक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी शिवाजी शिक्षण महाविद्यालयात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुणातून

अमरावती : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा व युवक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी शिवाजी शिक्षण महाविद्यालयात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुणातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले तसेच विविध क्रीडा स्पर्धातून कलाकौशल्य सादर केले. क्रीडा व युवक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी म्हणूनच युवा महोत्सवासोबतच क्रीडा स्पर्धाचे आयोजन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव चर्जन तर उद्घाटक म्हणून नाशिक मुक्त विद्यापीठाचे अंबादास मोहिते उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनसंचार संस्थाचे संचालक नदीम खान, शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना रोकडे, अनिरुध्द गावंडे, कैलास बोरसे यांची उपस्थिती होती. भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकमध्ये अनिरुध्द गावंडे यांनी मुक्त विद्यापीठाची पार्श्वभूमी मांडली. अध्यक्षीय भाषणामध्ये चर्जन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलागुणाना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे. देशभरात भाऊसाहेबांनी शिक्षणाचे बिजारोपण केले. त्यामुळे आज मुक्त विद्यापीठाने उंच भरारी घेतली आहे. युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा व महोत्सवात आपले कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे. क्रीडा व युवा महोत्सवात कार्यक्रमानंतर शास्त्रीय गायन, पाश्चिमात्य गायन, लोकनृत्य, पोस्टर मेकिंग, स्पॉट फोटोग्राफी, एकांकीका, शास्त्रीय नृत्य, कोलाज रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धांमध्ये भाला फेक, थाळीफेक, गोळा फेक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन खडसे, प्रास्तविक अनिरुध्द गावंडे व आभार प्रदर्शन के.बी. बोरसे यांनी केले. यावेळी भाऊसाहेब चौधरी, अंजली ठाकरे, गजानन गडीकर संगीता जवंजाळ, निखिलेश नलोडे, भोजराज चौधरी, विवेक गुल्हाने, विवेक जाधव आदी उपस्थित होते.