शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांनाच अडथळा

By admin | Updated: June 3, 2015 00:30 IST

शहरातील विस्कळीत वाहतूकीमुळे रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

अत्यावश्यक सेवेला फटका : सिग्नलवर थांबतात वाहनेअमरावती : शहरातील विस्कळीत वाहतूकीमुळे रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. दररोज आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज असणारी वाहने सिग्नलवरील अस्तव्यस्त वाहतुकीमुळे मध्यच थांबत आहेत. याबाबत प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांकडूनही सहकार्य मिळत नसल्याने वाहनचालकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी सत्वपरीक्षाच द्यावी लागत आहे.कोणतीही घटना सांगून येत नाही, असे म्हटले जाते. मात्र, घटना घडल्यानंतरही आतप्कालीन स्थितीत सज्ज असणाऱ्या वाहनांना सुरक्षित घटनास्थळी पोहोण्यास मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यात दररोज विविध घटना घडतात, कुठे अपघात तर कुठे आग लागल्याच्या घटना सुरुच असतात. अशा स्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाच्या वाहनांना वेळेत पोहोचणे गरजेचे असते. मोठ्या तत्परतेने रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपड करतात. लवकरात लवकर मदत करण्याचा त्यांचा उद्देश असतो. मात्र, शहरातील विस्कळीत वाहतुकीमुळे आपत्कालीन वाहने तत्काळ घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नसल्याची विदारक स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील राजकमल व राजापेठ या दोन्ही वर्दळीच्या मुख्य चौकात दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते.शहरातील अस्तव्यस्त वाहतूक व सिग्नलवर थांबणारी वाहने आपत्कालीन स्थितीसाठी अडथळा निर्माण करतात. शहरात गतिरोधकांची संख्या अधिक असल्यामुळे अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होते. याकडे प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. - भरतसिंग चव्हाण, प्रभारी अधीक्षक, अग्निशमन विभाग.रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने रुग्णवाहिका वेगाने न्यावी लागते. मात्र, अस्तव्यस्त वाहतूक व गतिरोधकांमुळे रुग्णांचे हाल होतात. सिग्नलवर नेहमीच वाहनांचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयात तत्काळ पोहोचून शकत नाही. अशावेळी रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. - अभिजित देशपांडे, रुग्णवाहिका चालक.