शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

By admin | Updated: May 14, 2015 00:13 IST

सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून येणाऱ्या दबावाला कंटाळून एक सदस्य अज्ञातस्थळी निघून गेला.

वडगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद : सदस्यानेच मागितले होते पोलीस संरक्षणनांदगाव पेठ : सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून येणाऱ्या दबावाला कंटाळून एक सदस्य अज्ञातस्थळी निघून गेला. बुधवारी सरपंचपदाच्या निवडणुकीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात तो ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचताच गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव करून वाहनावर दगडफेक केली. यामुळे गावात तणाव निर्माण झाला. ही घटना बुधवारी नजीकच्या वडगाव माहोरे येथे घडली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस कुमक आणि दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. वडगाव (माहोरे) हे आदर्श गाव. निवडणुकीत श्रीखंडे व माहोरे गट समोरासमोर होते. निवडणुकीत श्रीखंडे गटाचे पाच तर माहोरे गटाचे चार सदस्य निवडून आले. श्रीखंडे गटातून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कोकिळा आठवले, बिना कावनपुरे, दिलीप पाटील, माधुरी लंगडे व नितीन गवळी यांचा तर माहुरे गटातून विजयी झालेल्यांमध्ये शशिकांत माहुरे, प्रफुल्ल माहुरे, रोशनी माहुरे व नंदा माहुरे यांचा समावेश आहे. येथील सरपंचपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने श्रीखंडे गटाच्या नितीन गवळी यांची सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, ९ मे पासून नितीन गवळी बेपत्ता झाला. विरोधकांनी नितीनचे अपहरण केल्याची चर्चा होती. बुधवारी सरपंचपदाची निवडणूक असल्याने सकाळी ११.३० वाजता पोलीस बंदोबस्तात नितीन गवळीला ग्रा.पं. कार्यालयात आणण्यात आले.