शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महिला आयोगासमोर पेशी होण्यापूर्वीच श्रीनिवास रेड्डींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:12 IST

कॅप्शन - राज्य महिला आयोगाने रेड्डींना दिलेल्या डेडलाईनसंबंधी वृत्त. ----------------------------------------------------------------------- ३० एप्रिलपर्यंत जबाब दाखल करण्यासाठी मागितला होता वेळ, धारणी ...

कॅप्शन - राज्य महिला आयोगाने रेड्डींना दिलेल्या डेडलाईनसंबंधी वृत्त.

-----------------------------------------------------------------------

३० एप्रिलपर्यंत जबाब दाखल करण्यासाठी मागितला होता वेळ, धारणी पोलीस ठाण्याच्या लाॅकअपमध्ये मुक्काम

अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना जबाब दाखल करण्यासाठी कारणे नोटीस बजावली होती. रेड्डी यांनी नोटीसला उत्तर देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत वेळ मागितला होता. तथापि, २९ एप्रिल रोजी धारणी पोलिसांनी रेड्डींना अटक केल्यामुळे महिला आयोगापुढे जबाब दाखल करण्याची डेडलाईन ‘जैसे थे’ राहिली आहे.

‘लोकमत’मध्ये २६ मार्च २०२१ रोजी ‘महिला आरएफओंची गोळी झाडून आत्महत्या, हरिसाल येथील घटना, मानसिक व वैयक्तिक आरोप, सुसाईड नोटमध्ये उपवनसंरक्षकांचे नाव’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत २९ मार्च रोजी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी श्रीनिवास रेड्डी यांना राज्य महिला आयोग अधिनियम १९९३, कलम १०(२) नुसार तक्रार निवारणार्थ नोटीस बजावली होती. मात्र, रेड्डी यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईमुळे त्यांनी महिला आयोगाला नोटीसचे जबाब नोंदविण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत अवधी मागितला होता. रेड्डी हे वकिलांमार्फत राज्य महिला आयोगाकडे प्रकरणाशी निगडीत बाबींवर जबाब सादर करणार होते. मात्र, आयपीएस चौकशी पथकप्रमुख डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी दीपाली आत्महत्याप्रकरणी श्रीनिवास रेड्डींच्या अटकेचे आदेश दिलेत. त्यानुसार नागपूर येथून रेड्डींना नागपूर क्राईम ब्रँच व अमरावती पोलिसांच्या पथकाने २८ एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा रेड्डींना ताब्यात घेतले. धारणी पोलीस ठाण्यात २९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता अटक करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली. आता रेड्डी पोलिसांच्या ताब्यात असल्याने महिला आयोगाकडे सादर करावयाचा जबाब लांबणीवर पडला, हे विशेष.

--------------------

रेड्डींच्या अटकेने आयएफएस लॉबी हादरली

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक हे पद राज्य शासनात अपर प्रधान सचिव दर्जाचे आहे. नोकरशाहीत आयपीएस, आयएएस याचप्रमाणे आयएफएस लॉबी सक्रिय आहे. तथापि, एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डींचे निलंबन व अटकेच्या कारवाईने आयएफएस लॉबी हादरून गेली आहे. सोशल मीडियावर रेड्डींच्या अटकेबाबत दोन मतप्रवाह आहेत. रेड्डींना आरोपी म्हणून दिलेली वागणूक बघून आयएफएस लॉबीला शॉक बसला आहे. रेड्डींच्या दिमतीला तीन शासकीय वाहने, मोठा बंगला, नोकऱ-चाकर, आजूबाजूला नियमित ‘यस सर’ म्हणणारे अधिकारी, कर्मचारी हा बडेजाव दीपाली प्रकरणाने संपुष्टात आला. त्यामुळे आता आयएफएस अधिकारी सावध झाल्याचे चित्र आहे.