शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील जोडीदार बाहेरख्याली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

बाहेरच्या पानासाठी श्रीकृष्ण मालपे नेरपिंगळाई : पाच वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असताना देखील ती बाहेरख्यालीपणा करत होती. दारू देखील ...

बाहेरच्या पानासाठी

श्रीकृष्ण मालपे

नेरपिंगळाई : पाच वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असताना देखील ती बाहेरख्यालीपणा करत होती. दारू देखील पित होती. आपण दुर्धर व्याधीने ग्रस्त आहोत, हे माहित असतानाही ती दुसऱ्यांना आजार वाटत फिरत होती, तिला अनेकदा समजावले. मात्र ती मानायलाच तयार नव्हती. त्यामुळे संताप अनावर होऊन तिला एकदाचे संपविले, अशी खळबळजनक कबुली मणिमपूर येथील ४२ वर्षीय आरोपीने दिली आहे. त्याला शिरखेड पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली. त्यानंतर हा घटनाक्रम उघड झाला.

५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास मोर्शी तालुक्यातील तळेगाव ते विचोरी मार्गावरील एका शेतात एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या महिलेची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध खून, खुनाचा पुरवा नष्ट करणे व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ती महिला तळेगाव येथे वीटभट्टीवर काम करणाºया व मनिमपूर येथील मुळ रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय इसमासोबत विनालग्न राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानेच तिची ओळख देखील पटविली. मात्र, सुरू वातीला त्याने ‘मी तो नव्हेच’ ची भूमिका घेतली. मात्र, रविवारी एकंदरीत परिस्थितीवरून शिरखेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीसी हिसका दाखवताच त्याने महिला जोडिदाराच्या हत्येची कबुलीदेखील दिली. चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली. तर, सोमवारी त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्याला १२ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोघेही विवाहित अन् व्याधीग्रस्त

आरोपी व मृत महिला दोघेही विवाहित आहेत. मात्र, एकमेकांच्या जोडीदारांसोबत न राहता ते तळेगाव विटभट्टी परिसरात नवरा बायकोप्रमाणे राहू लागले. त्या नात्याला पाच वर्षे झालीत. मात्र तिला दारूचे व्यसन लागले. दारूसाठी पैसे नसल्याने ती अनैतिकतेकडे वळली. त्यातच दुर्धर व्याधीग्रस्त झाली. ती देखील त्या आजाराने बाधित झाला. असे असतानाही ती बाहेरख्यालीपणा करीत होती. त्यातून तिला संपविल्याची कबुली आरोपीने शिरखेड पोलिसांना दिली.

कोट

महिलेच्या हत्येप्रकरणी मनिमपूर येथील मुळ रहिवाशी असलेल्या ४२ वर्षीय आरोपीला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली. आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. कारण देखील सांगितले.

केशव ठाकरे,

ठाणेदार, शिरखेड पोलीस ठाणे

------------------