शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे दर आवाक्याबाहेर

By admin | Updated: June 11, 2014 22:59 IST

खरीप २०१४ हंगाम सुरु होण्याअगोदरच सोयाबीन बियान्याच्या किंमतीमध्ये हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे. काळाबाजारात यापेक्षा दुप्पट दरात विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांनी मोठ्या

रोहिणीचा दगा, मृगात प्रतीक्षा : आर्थिक विवंचनेत शेतकरी
गजानन मोहोड - अमरावती
खरीप २०१४ हंगाम सुरु होण्याअगोदरच सोयाबीन बियान्याच्या किंमतीमध्ये हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे. काळाबाजारात यापेक्षा दुप्पट दरात विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भाववाढ केल्याने बाजारातील

सोयाबीन विकत घेणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्याला मृगात पावसाची प्रतीक्षा, वाढलेले भाव, शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना यामुळे बियाणे बाजारातील वर्दळ मंदावली आहे.
परतीच्या पावसामुळे मागील वर्षीचे सोयाबीन खराब झाले. या सोयाबीनची उगवणशक्ती कमी झाली, बियाणे कंपन्याचे प्लॉट देखील खराब झाले. प्रमाणीकरणात ५० टक्क््यावर बियाणे नापास झाले. महाबीजसह अन्य कंपन्यांचा सोयाबीन पुरवठा कमी झाला.

महाराष्ट्राला सर्वाधिक सोयाबीनचा पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशातील सोयाबीनदेखील पावसाने खराब झाल्याने सोयाबीनचा पुरवठा करण्यावर विपरीत परिणाम झाला. शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपले. बाजारात सोयाबीन उपलब्ध नाही हे हेरुन सोयाबीन

बियाणे उत्पादक कंपन्याद्वारा ‘अव्वाच्या सव्वा’ दराने बियाणे विक्री करण्यात येत आहे.
३५ किलोची राहणार बॅग
केंद्र सरकारने महाबीजला ६० ते ६९ टक्के उगवणशक्तीचे बियाणे विकण्याची परवानगी दिली आहे. या दर्जानुसार फक्त २ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होत आहेत. या उगवणशक्तीच्या बियाण्याची बॅग ३२०५ किलो व यापेक्षा ५ टक्के उगवणशक्ती कमी

असलेल्या बियाण्याची बॅग ३५ किलोची राहणार आहे. मात्र किंमत ही ३० किलोची राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वांझोटी
जिल्ह्यात सोयाबीन बियाणे टंचाईचे सावटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी २८ एप्रिल २०१४ रोजी सोयाबीन उत्पादक कंपन्यांची बैठक घेऊन उत्पादित बियाणे जिल्ह्यातच विकण्याचे आदेश या कंपन्यांना दिलेत. किमान १५ ते २०

हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. प्रत्यक्षात या अन्य जिल्ह्यातदेखील सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वांझोटीच ठरली.