शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या खर्चानंतरही पानगळ सुरूच

By admin | Updated: December 29, 2014 23:35 IST

मेळघाटात मागील आठ महिन्यांत एकूण ३६५ बालकांचे मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव पुढे आले असून प्रशासनाने बालमृत्यू कमी झाल्याचा केलेला दावा पुन्हा फोल ठरला आहे.

चांदूरबाजार : मेळघाटात मागील आठ महिन्यांत एकूण ३६५ बालकांचे मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव पुढे आले असून प्रशासनाने बालमृत्यू कमी झाल्याचा केलेला दावा पुन्हा फोल ठरला आहे.
१९९६-९७ मध्ये धारणी तालुक्यात झालेल्या हिराबंबई येथील २१ बालमृत्यूमुळे कुपोषणाचा विक्राळ चेहरा सर्वप्रथम जगासमोर आला. तेव्हापासून वर्षाला ५०० ते ६०० बालमृत्यू याप्रमाणे येथे कोवळी पानगळ सुरूच राहिली आहे. यातील अनेक बालके जन्मास आल्यानंतर आपला पहिला वाढदिवस बघण्यासही जिवंत नसतात. हेच येथील मानवतेला लाजविणारे सत्य राहिले आहे. प्रशासनातर्फे येथील कुपोषण निर्मूलनासाठी वर्षाला कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याने बालमृत्यू दर कमी झाल्याचा दावा आरोग्य विभागाकडून कितीही केला जात असला तरीही राज्यातील बालमृत्यूदरापेक्षा मेळघाटातील बालमृत्यूदर हा बराच अधिक असल्याचे चित्र आहे. राज्याचा दर ३६ हजार बालकामागे असताना मेळघाटात ४२ आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या अहवालानुसार २०१३-१४ मध्ये मेळघाटात ६ वर्षे वयापर्यंतच्या ६०० बालकांचे मृत्यू शाळेत मागील २०१२-१३ या वर्षातही आकडेवारी ४०९ इतकी होती. त्यामुळे येथील कोट्यवधीच्या खर्चासोबतच आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गरोदर मातांचे रुग्णालयामधील प्रसूतीचे प्रमाण वाढवावे, असे राष्ट्रीय मिशन आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जाते. परंतु मेळघाटात हे मिशन अद्यापही प्रभावशाली झाल्याचे दिसून आलेले नाही. येथे कार्यरत असलेल्या विविध शासकीय योजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचा खर्च होऊनही परिस्थितीत का बदल होत नाही हा आता सार्वजनिक विषय बनला आहे. सन २०१३-१४ या वर्षात मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात अमरावती जिल्ह्यातील इतर १२ तालुक्यातील बालमृत्यूपेक्षा दुप्पट मृत्यू झालेले आहे.
त्यातही कमी वजनामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. न्युमोनिया व हायपोयर्मियामुळेही अनेक बालके मरण पावली आहेत. १९८ बालकांना घरीच आपले प्राण गमवावे लागले आहेत.
राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशनच्या अहवालानुसार मेळघाटात मध्यम आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या ही ४२ टक्क्यांपर्यंत आहे. गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण ६ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. येथील आदिवासींचे रोजगारासाठी होत असलेले स्थानांतरण बघता त्यांच्या भागात रोजगार निर्मिती करण्यास प्रशासनास आलेले अपयशच म्हणावे लागेल.
माता-पित्यांसह बालकेही कामाच्या ठिकाणी स्थलांतरित होत असल्याने लहान बाळांची आबाळ होते. आधीच प्रतिकारशक्ती कमी असलेली बालके आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत ढकलली जातात आणि प्राणास मुकतात.