शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या सुरक्षेसाठी सौर विद्युत कुंपण

By admin | Updated: June 1, 2016 00:49 IST

सौर विद्युत कुंपण पद्धतीत प्राण्यांना मानसिकरीत्या भयभीत करून अडविण्यासाठी एक नियंत्रित व सुरक्षित असा विद्युतप्रवाह तारांमधून वाहत असतो.

अमरावती : सौर विद्युत कुंपण पद्धतीत प्राण्यांना मानसिकरीत्या भयभीत करून अडविण्यासाठी एक नियंत्रित व सुरक्षित असा विद्युतप्रवाह तारांमधून वाहत असतो. एखादा प्राणी या तारेच्या संपर्कात आला, की त्याला सुरक्षित झटका (शॉक) बसतो, त्यामुळे तो प्राणी या विद्युत कुंपणापासून लांब राहतो, या शॉकमुळे प्राण्यांचे शारीरिक नुकसान होत नाही. अशा रीतीने हे कुंपण प्राण्यांना केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिकदृष्ट्या शेताजवळ येण्यास प्रतिबंधित करते. एकदा प्राण्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला, की ते कुंपणापासून दूर राहतात, अशावेळी काही काळासाठी वीजपुरवठा खंडित करून वीज बचत करता येते. ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तारेचे कुंपण अगोदरपासून उपलब्ध असेल, अशा ठिकाणी एका किंवा दोन तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून प्रभावी सौर विद्युत कुंपण प्रणाली विकसित करता येते.यामुळे ही विद्युत कुंपण प्रणाली अतिशय सुरक्षित व कार्यक्षम ठेवलेली आहे. अशा कुंपण पद्धतीमध्ये अलार्म बसविल्यास आणि कुंपणाच्या सानिध्यात एखादा प्राणी आल्यास तो लगेच वाजायला सुरुवात होते. सौर विद्युत कुंपणाच्या प्रकारानुसार त्यासाठी लागणारा संभाव्य खर्च थोडाफार कमी-अधिक होऊ शकतो. तो १२ व्होल्ट डी.सी. प्रवाह प्रत्येक १.२ सेकंदानंतर ०.०३ सेकंदासाठी सतत पाठवीत असतो.कुंपण घंटा : ही घंटा ज्ञानेंद्रिय पद्धतीवर काम करते. एखादा प्राणी कुंपण्याच्या संपर्कात आल्यास लगेच ही घंटा वाजायला सुरुवात होते.बॅटरी : १२ व्होल्ट ४२ अ‍ॅपियरची बॅटरी वापरली जाते. ती सौर पॅनेलने चार्ज करता येते.चार्जर : सोलर पॅनेलपासून तयार झालेल्या विद्युतप्रवाह बॅटरीमध्ये व्यवस्थितरीत्या साठवण्यासाठी आणि येणारा विद्युतप्रवाह नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो.खांब : खांब हे लाकडाचे, सिमेंटचे किंवा लोखंडापासून बनविलेले असतात. शक्यतो जास्त काळ यंत्रणा टिकून राहावी याचा विचार करूनच खांब खरेदी करावेत. साधारणत: त्यांची उंची ५ फुट एवढी असावी आणि आवश्यकतेनुसार जाडी ठेवावी.कुंपण तारा : कुंपण तारा साधारणत: २.५ मि.मी जाडीची, धातूपासून बनविलेली असते, ती गजू नये यासाठी त्यावर जास्ताचे आवरण दिले जाते.- सदानंद देशपांडे,श्रीनिवास इरिगेशन सर्व्हिसेस,अमरावती