शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी हटविण्याचा डाव

By admin | Updated: May 18, 2015 00:02 IST

बडनेरा ते अंजनगाव बारी मार्गालतच्या म्हसला शिवारात शासकीय जमिनीवर शेती असल्याचा दावा करुन ....

म्हसला येथील प्रकार : शासकीय जमिनीवर शेतीचा दावाअमरावती : बडनेरा ते अंजनगाव बारी मार्गालतच्या म्हसला शिवारात शासकीय जमिनीवर शेती असल्याचा दावा करुन अस्तित्वात असलेली घरे, झोपडपट्टी हटविण्याचा डाव रचला जात आहे. मात्र या जागेवर स्मशानभूमी, एफ क्लासची नोंद असल्याचे वास्तव पुढे आले आहे.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिलेल्या निवेदनात म्हसला येथे ३० ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेले पंजाबराव काललकर आणि शैलेश काललकर यांनी पोलिसांना हाताशी धरुन झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावून ही जागा खाली करण्याच्या सूचना केल्या आहेत. म्हसला शिवारात ३० वर्षांपासून घरे बांधून राहत असताना अचानक शासकीय जमिनीवर दावा ठोकून झोपडपट्टीवासीयांना बेघर करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मौजे म्हसला, शेत सर्वे क्र. १ मधील शेतात भोगवटदार वर्ग १ च्या शेतजमिनीवर राहत आहे. काललकर यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात चुकीच्या पद्धतीने तक्रार दाखल करुन शासकीय जमीन हडपण्याचा डाव रचला जात आहे. ज्या जमिनीवर घरे निर्माण करुन नागरिक राहत आहे, त्या जमिनीचे गाव नमुना सात मध्ये सरकार, अशी नोंद आहे. २.७१ हेक्टर आर इतक्या जागेवर सदर इसमाने दावा केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी गाव नमुना सातमध्ये स्पष्टपणे नोंद केली असताना पोलीस प्रशासनाने झोपडपट्टीधारकांना या जागेवरुन हटविण्याची जणू ‘सुपारी’च घेतली अशा प्रकारे कारवाईचा धाक दाखवित असल्याचा आरोप शारदा पाटील, राजू वानखडे, उषा इंगळे, आशा वरघट, सरुबाई खडसे, निर्मला कांबळे, सुजाता चऱ्हाटे, ताराबाई यमले, लिलाबाई इंगोले आदींनी केला आहे. (प्रतिनिधी)झोपडपट्टीधारक पालकमंत्र्यांना भेटणारम्हसला येथील शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या गरिबांना हटविण्याचा डाव रचणाऱ्या पोलीस प्रशासनाची पोलखोल उघड करण्यासाठी संबंधित झोपडपट्टीधारक २० मे रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची भेट घेतील. ही जागा शासकीय असताना अचानक दावा करुन जमीन ताब्यात घेण्यासाठी पोलीस बळाचा आधार घेत असल्याची आपबिती पालकमंत्र्यांच्या पुढ्यात ठेवणार आहेत.'ही' जमीन लीजवर दिल्याची माहितीमौजे म्हसला येथील जमिनीवर अस्तित्वात असलेली घरे आणि झोपडपट्टी ही प्रशासनाने पंजाबराव काललकर यांना ९० वर्षांसाठी लीजवर दिल्याची माहितीे समोर आली आहे. ही जमीन काही वर्षांापसून पडीक असल्याने काही जणांनी येथे घरे निर्माण करण्याची शक्कल लढविली आहे. ही जमीन लीजवर असल्याने त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, असे पोलीस तक्रारीत नमूद आहे.