सुफियानगरातून साडेसहा लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:12 IST2020-12-29T04:12:12+5:302020-12-29T04:12:12+5:30

(फोटो आहे. ) अमरावती: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरीगेट हद्दीतील वाहेद डी.एड. कॉलेजमागील सुफियानानगरात धाड टाकून ६ लाख ३१ ...

Six and a half lakh cannabis seized from Sufianagar | सुफियानगरातून साडेसहा लाखांचा गांजा जप्त

सुफियानगरातून साडेसहा लाखांचा गांजा जप्त

(फोटो आहे. )

अमरावती: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरीगेट हद्दीतील वाहेद डी.एड. कॉलेजमागील सुफियानानगरात धाड टाकून ६ लाख ३१ हजारांचा ६३ किलो १०० ग्रॅम गांजा व दोन मोबाईल असा एकूण ६ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

सिद्दिकी शाह अकबर शाह (३२, रा. सुफियाननगर) असे गांजा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूअप्पा बाहेनकर, जावेद अहमद, अजय मिश्रा, इजाज शाह, दिनेश नांदे, निवृत्ती काकड, गजानन सातंगे, राजेश बहिरट आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Six and a half lakh cannabis seized from Sufianagar