शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

पुण्याच्या एसटी आरक्षण बुकींगला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 5:00 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत प्रवाशांत घट झाली आहे. रोजचे आरक्षण २० ते ३० हजारांचे होत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दिवाळीनंतर रोज अमरावतीहून सर्व मार्गावर ३७५ बस सोडण्यात येत आहेत. त्याचा प्रवास प्रतिदिन  १ लाख १५ हजार किमी होत आहे. त्यातून एसटीला ३२ लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे श्रीकांत गभणे म्हणाले. गत वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीनंतर कमी बस सोडण्यात येत आहेत.

ठळक मुद्देकोविड-१९ नियमांचे पालन

  संदीप मानकर    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीनंतर परतीच्या प्रवासाला एसटी महामंडळ अमरावती विभागामार्फत अमरावतीहून पुणेकरिता सहा शिवाशाही बसेस सोडण्यात येत आहे. मात्र, गत तीन दिवसांपासून दोनच बसचे आरक्षण होत आहे. त्यालाही अल्प प्रतिसाद असून, गत तीन दिवसांपासून रोज १० ते ४० प्रवाशांचे आरक्षण होेत असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत प्रवाशांत घट झाली आहे. रोजचे आरक्षण २० ते ३० हजारांचे होत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दिवाळीनंतर रोज अमरावतीहून सर्व मार्गावर ३७५ बस सोडण्यात येत आहेत. त्याचा प्रवास प्रतिदिन  १ लाख १५ हजार किमी होत आहे. त्यातून एसटीला ३२ लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे श्रीकांत गभणे म्हणाले. गत वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीनंतर कमी बस सोडण्यात येत आहेत.  

पुण्याकरिता अतिरिक्त फेऱ्या दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर अमरावती एसटी विभागाने पुणेकरिता रोज सहा बसचे नियोजन केले होते. यामध्ये पाच शिवशाही बस व एक साधी नाॅन एसी स्लीपर बस सोडण्यात येत होती. पूर्ण क्षमतेने प्रवासी नेण्याची परवानगी शासनाने दिली. ४४ सीटर क्षमतेची बस आहे. मात्र लांबपल्याच्या मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसत नाही. 

ग्रामीण भागातील फेऱ्या वाढविल्या  दिवाळी, भाऊबीजनिमित्त पाहुणे, बहिणी घरी येतात. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी परत जातात. त्यामुळे अमरावती मुख्यालयापासून ५० किमी अंतरावरील तालुक्यांमध्ये बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून, गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

चिखलदरा पर्यटनासाठी फेऱ्यामंदिरे भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे शेगावकरिता विशेष बस तसेच फेऱ्या वाढविण्यात येत आहेत. चिखलदरा येथेसुद्धा पर्यटनासाठी नागरिक अधिक असल्याने या मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. 

परतीच्या प्रवासाची आरक्षण स्थिती अमरावतीहून पुण्याकरिता परतीच्या प्रवासाला गत तीन दिवसांत आरक्षण बुकींगला अल्प प्रतिसाद मिळाला. पुणेकरिता शिवाशाहीचे प्रतिव्यक्ती तिकीट १०९० रुपये, तर साध्या बसचे ९०० रुपये आहे. फक्त दोनच बसेसला आरक्षण मिळाला. यामध्ये सोमवारी १५, मंगळवारी २५, तर बुधवारी २० प्रवाशांचे आरक्षण पुणेकरिता झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खासगी बसचे बूकिंग हाऊसफुल्ल पुण्याकरिता नागपूरहून अमरावती मार्गे दररोज विविध कंपन्यांच्या ३० ते ४० खासगी बस सुटतात. एसटी महामंडळाच्या बसच्या तुलनेत खासगी बसचे बूकिंग हाऊसफुल्ल होते. अमरावतीहून पुण्याकरिता प्रतिप्रवासी ९०० ते  एक हजारापर्यंत तिकीट दर आकरण्यात आल्याचे एका ट्रॅव्हल्स कंपनीचे  कर्मचारी मंगेश गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता ५० बसअमरावतीहून लांबपल्ल्याच्या प्रवासाकरिता दिवाळीनंतर ५० बसेस रोज सोडण्यात येत आहे. यामध्ये अमरावती- पुणे, अमरावती औरंगाबाद, पंढरपूर, छिंदवाडा, नांदेड, माहूर, औरंगाबाद तसेच इतर मार्ग़ावर बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. 

 

टॅग्स :state transportएसटी