शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतला रेल्वे मार्गाचे लवकरच होणार ब्रॉडगेज!

By admin | Updated: September 27, 2015 00:16 IST

मूर्तिजापूर ते अचलपूर हा ७७ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करून पुढे चांदूरबाजारपर्यंत जोडला जावा.

अंजनगाव सुर्जी : मूर्तिजापूर ते अचलपूर हा ७७ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करून पुढे चांदूरबाजारपर्यंत जोडला जावा. जेणेकरुन अमरावती-नरखेड ते पुढे बैतूल हा दिल्लीस जाणारा मार्ग अंजनगाव-दर्यापूरवासीयांना उपलब्ध होईल, अशी माहिती खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे रेल्वे प्रकल्प आढावा बैठक झाली. राज्यातील आणि विशेषत: विदर्भातील रखडलेल्या रेल्वे मार्गांच्या समस्या निकाली काढून हे प्रकल्प गतिमान व्हावेत यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्यात आली. याअंतर्गत यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर होणार आहे. विदर्भातील इतर चार मोठे रेल्वेमार्गही या कंपनीअंतर्गत विकसित होतील, अशी अपेक्षा आहे. अचलपूर ते चांदूरबाजार हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. यामुळे शकुंतलेच्या मार्गातील अंजनगाव-दर्यापूर वासीयांना ब्रॉडगेजच्या माध्यमातून थेट नरखेड रेल्वे लाईनवर बैतूल ते दिल्ली हा मार्ग उपलब्ध होईल. अकोला ते खंडवा नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे व बडनेरा येथील वॅगन दुरुस्तीच्या कामास गती देणे, हे या बैठकीचे महत्त्वाचे फलित आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सहभागाविषयी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री आणि खासदार यांच्यात पुढील बैठकीचे नियोजन झाले आहे. त्यामध्ये विदर्भातील रेल्वे प्रकल्प गतिमान करण्यावर भर दिला जाईल. मराठी माणसांच्या या कर्तृत्वामुळे आणि विदर्भपूत्र मुख्यमंत्री झाल्याने या भागातील रेल्वेचा अनुशेष भरुन काढण्यासाठी भरीव कामगिरी करण्याचा हा मानस अभिनंदनीय आहे. मूर्तिजापूर ते अचलपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी पाचशे कोटींची आवश्यकता असून रेल्वे मंत्रालयाच्या पिटीशन कमेटीत दावा दाखल करुन खा. अडसूळ यांनी या रेल्वे मार्गासाठी निधी मागितला होता. यासाठी मंजुरी प्राप्त झाल्याने आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यामधील राज्य शासनाचा हिस्सा मान्य झाल्यामुळे लवकरच या मार्गाच्या ब्रॉडगेजसाठी सुरुवात होणार असल्याचे खासदार अडसूळ यांनी सांगितले आहे.