शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

अमरावती जिल्ह्यात जिवाचा धाक घालून युवतीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 10:53 IST

अचलपूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याची फिर्याद पीडितेने मंगळवारी दुपारी पोलिसांत दिली.

ठळक मुद्देअचलपूर नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस कर्मचारी असलेल्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह व स्वत:च्या शिक्षणासाठी कारंजा घाडगे येथून परतवाड्याला आलेल्या युवतीला सतत तीन वर्षांपासून जिवे मारण्याची धमकी देत अचलपूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याची फिर्याद पीडितेने मंगळवारी दुपारी पोलिसांत दिली. या प्रकरणाने जुळ्या शहरांत एकच खळबळ उडाली. नरेंद्र रतन तांबे (३८) असे नराधमाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील सदर २६ वर्षीय युवती तीन वर्षांपूर्वी परतवाडा शहरात एका खासगी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. यादरम्यान माजी नगरसेवकपुत्र तसेच भाजपच्या नगरसेविकेचा दीर, सफाई कर्मचारी नरेंद्र तांबे याची नजर तिच्यावर गेली. तो तिचा सतत पाठलाग करीत असे. एक दिवस त्याने स्वत:चा मोबाईल नंबर तिला दिला. सेमाडोह जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आपल्याकडे चित्रफीत असल्याचे धमकावित तीन वर्षांपासून तो सतत अत्याचार करीत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट युवतीने पत्रपरिषदेत केला. यानंतर तिने थेट परतवाडा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.सदर प्रकार कुणाला सांगितला किंवा पोलिसांत गेल्यास भावाला जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याने मी गप्प राहिले. मात्र, त्रास असह्य झाल्याने पत्रकार व पोलिसांपुढे जाण्याचा मार्ग निवडल्याचे तिने सांगितले.पीडितेचे वडील नागपूर येथे पोलीस कर्मचारी होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब कारंजा घाडगे येथे स्थायिक झाले. आई, तीन बहिणी, भाऊ असे हे कुटुंब आहे.

पीडित युवतीच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.संजय सोळके, ठाणेदार, परतवाडा

आईला मारहाणमोबाईलवर किंवा प्रत्यक्षात कुणाही सोबत बोलले असता, तांबे त्यांना धमकावतो, मारहाण करतो व ही माझी तिसरी पत्नी असल्याचे सांगत अब्रूचे धिंडवडे काढतो आहे. माझ्या आईलादेखील त्याने मारहाण केली. आपले लग्न होऊ नये, यासाठी तो समाजातही बदनामी करीत असून, आपल्या जीवाला धोका असल्याचे पीडित युवतीने सांगितले.

करियर संपवलेखासगी कॉन्व्हेंटमधील नोकरी सुटल्यानंतर युवतीने मिल कॉलनीत एमपीएससीचे क्लासेस घेण्यासाठी किरायाने खोली घेतली. तेथे येऊन तांबे दररोज अत्याचार, मारहाण करतो व धमक्या देतो. परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकातील बालाजी नामक एका लॉजमध्ये त्याने तीन वेळा अत्याचार केला, तर दोन वेळा गोळ्या देऊन गर्भपात केला, असे तरुणीने सांगितले.

कुणाची फसवणूक होऊ नयेतांबेच्या पूर्वीच्या दोन पत्नी असून, तो युवतींना फसवून त्यांचे शारीरिक शोषण करतो. आपल्याप्रमाणे अन्य मुलगी त्याच्या जाळ्यात फसू नये, यासाठी आपल्यावरील अत्याचार सार्वजनिक करीत असल्याचे युवतीने स्पष्ट केले. पत्रपरिषदेनंतर युवतीने थेट पोलीस ठाणे गाठल्याने पोलिसांच्या भुवया उंचावल्या होत्या. यापूर्वीही नरेंद्र तांबेच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग