शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात हजार सैनिक देश रक्षणासाठी तैनात

By admin | Updated: March 4, 2015 00:46 IST

देशवासियांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे जिल्ह्यातील सात हजार सैनिक देशाच्या

राष्ट्रीय सुरक्षा दिवस विशेष : शहरात १० हजार पॅरामिल्ट्रीफोर्सवैभव बाबरेकर ल्ल अमरावतीदेशवासियांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे जिल्ह्यातील सात हजार सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी सिमेवर तैनात आहेत. तसेच जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षेकरिता तब्बल १० हजार पॅरामिल्ट्रीफोर्स (अन्य सुरक्षा यंत्रणा) नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातील सैनिकांचा घेतलेला हा आढावा. देश सुरक्षित तर, नागरिक सुरक्षित जीवन जगू शकतात. देशाची सुरक्षा करणारे सैनिक देशाच्या सीमेवर २४ तास पहारा देत असल्यामुळे नागरिक सुरक्षित जीवन जगू शकतात. या सैनिकांच्या जीवनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाकडून सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना सुविधा उपलब्ध करुन देत असल्याने सैनिक कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावू शकतात. आपल्या जीवाची पर्वा न करता सैनिक २४ तास डोळ्यात तेल घालून देशवासीयांना सुरक्षा प्रदान करीत आहे. अमरावती जिल्ह्यात सात हजार सैनिक असून सद्यस्थितीत हे सर्व सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांतच अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस विभागासह अन्य काही विभागासुध्दा तैनात आहेत. मिल्ट्रीमध्ये आर्मी, नेवी व एअर फोर्स या तिन्ही यंत्रणाचा सहभाग असून अमरावती जिल्ह्यातून सात हजार सैनिक देशपातळीवर सुरक्षेसाठी तैनात आहेत.सैनिकांना आर्थिक मदत४देश रक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सैनिकांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आर्थिक मदत दिली जाते. सैनिकांना वैद्यकीय सेवा, त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत, मुलींचे विवाहासाठी मदत, माजी सैनिकांना नोकरीत १५ टक्के आरक्षण, माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (६० टक्केवर गुण) अशा प्रकारची आदी आर्थिक मदत दिल्या जात आहे.राष्ट्रीय सुरक्षा ही नागरी वस्तीपासून तर देशाच्या सीमेपर्यंत होणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रत्येकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. माजी सैनिकांनी दिलेल्या योगदानाचा आदर व त्यांच्या आठवणी जपून ठेवणे हे देशवासियांचे कर्तव्य आहे. त्यांची जाणीव प्रत्येकांनी ठेवावी, तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही ठेवावी. दिनेशकुमार गोवारे, सैनिक कल्याण संघ.