शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाच्या अवशेषासाठी माडू नदीत शोधमोहीम

By admin | Updated: September 27, 2014 00:58 IST

स्थानिक पांढुर्णा चौक परिसरातील नितीन बैस (३३ ) यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी अलीबागच्या विशेष पथकाने माडू नदीत ...

वरुड : स्थानिक पांढुर्णा चौक परिसरातील नितीन बैस (३३ ) यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी अलीबागच्या विशेष पथकाने माडू नदीत शोधमोहीम राबविली. परंतु दोन दिवसांत पथकाच्या हाती काहीच लागले नाही. मृत नितीन बैस यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी योगेश घारड, राम दुर्गे, राम बिजवे, दिनेश बारस्कर आणि कार चालक रमांकात ब्राम्हणे यांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींनी संगणमताने हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याची कबुली दिली. पाचही आरोपींना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीदरम्यान पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता मृतदेहाचे अवशेष आणि सोन्याचा गोफ माडू नदीत फेकल्याची कबुली दिल्यावरुन वरुड पोलिसांनी मोर्शीलगतच्या मायवाडी येथील माडू नदीत शोध सुरु केला. यासाठी पनवेल अलीबाग येथील क्युबा डायव्हर सेंटरचे पाच सदस्यीय पथक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक यांची संयुक्त नैसर्गिक आपत्ती निवारण पथकाने नदीपात्रात शोध सुरु केला. परंतु पथकाला काहीच सापडले नाही. हत्या प्रकरणातील मृताची जळालेल्या अवस्थेतील कारमधून दोन जिवंत काडतूस मिळाली. रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. जळालेल्या कारची प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने काटेकोर तपासणी केली. या तपासणीसाठी प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावतीचे उपसंचालक विजय ठाकरे, सहायक रासायनिक विश्लेषक पी.एस. केनेसह पथक वरुडला आले होते. वरुड पोलिसांनी पाचही आरोपींविरुध्द शस्त्राच्या धाकावर अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी भादंविचे कलम ३६४, ३४ आर. डब्ल्यू ३(२५) आर्म अ‍ॅक्ट, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)